हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Helicopter Manufacturing Factory । महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला आता होमपीच असलेल्या नागपूर मधूनच बळ मिळणार आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात सुमारे आठ हजार कोटी रुपये गुंतवणूक हेलिकॉप्टर उत्पादन निर्मितीचा कारखाना उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा.लि. आणि महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागात यासंदर्भातील सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे जवळपास २००० तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
8000 कोटी रुपयांची गुंतवणूक- Helicopter Manufacturing Factory
सह्याद्री अतिथिगृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते. या करारानुसार मॅक्स एरोस्पेस नागपूर येथे हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना (Helicopter Manufacturing Factory) उभारणार असून, या प्रकल्पाच्या निमित्ताने तब्बल ८००० कोटी रुपयांची गुंतवणूक नागपुरात केली जाईल. 2026 पासून या हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारणीचा प्रकल्प सुरु होईल. यानिमित्ताने २००० तरुणांना नोकरीची संधी मिळेल. हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन आणि पूर्ण उत्पादन यासाठी समर्पित असलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे एरोस्पेस उत्पादनाचं महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे. नागपूर विमानतळाजवळ हे केंद्र असल्यानं विद्यमान पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक सपोर्टचा लाभ घेता येणार आहे. या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश असून, रोटरी-विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग यासाठी हे उत्कृष्टता केंद्र (सेन्टर ऑफ एक्सलन्स) म्हणून कार्य करणार आहे.
या करारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. मॅक्स एरोस्पेसने हेलिकॉप्टर उत्पादनासाठी महाराष्ट्र त्यातही नागपूरची निवड केल्याचा आनंद आहे. मॅक्स एरोस्पेसच्या व्यवसायाच्या प्रवासात राज्य सरकार सुद्धा सहभागी आहे. नागपूरमध्ये संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल. मॅक्स एरोस्पेसला त्यांच्या उत्पादन कारखान्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. कंपनीने आपले उत्पादनाचे काम ठरलेल्या वेळेत सुरू करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.