Helicopter Service On Mumbai Delhi Expressway : नाद खुळा!! या एक्सप्रेसवे वर सुरु झाली हेलिकॉप्टर सेवा

Helicopter Service On Mumbai Delhi Expressway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Helicopter Service On Mumbai Delhi Expressway । भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेवर आता हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्यात आली आहे. ऐकायला जरी जे नवल वाटत असलं तरी खरं आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील पिनान शहरात एक्सप्रेसवेच्या १२५ व्या किलोमीटर अंतरावर असलेल्या विश्रांती क्षेत्रात हेलिकॉप्टर सेवा औपचारिकपणे सुरू करण्यात आली. ही सेवा भारतीय महामार्गांवर आपत्कालीन वैद्यकीय सेवा जलद आणि अधिक सुलभ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.

मुंबई आणि दिल्ली या देशातील २ महत्वाच्या शहरांना जोडणारा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे सध्या अंशतः खुला आहे आणि येत्या काळात कामे पूर्ण झाल्यानंतर तो पूर्णपणे सर्वसामान्यांच्या वापरात येणार आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा देशातील सर्वात व्यस्त आणि हाय-स्पीड मार्गांपैकी एक आहे, ज्यावरून दररोज हजारो वाहने जातात. तथापि, उच्च गतीमुळे अनेकदा गंभीर अपघात होतात. रस्ते अपघातानंतरचा पहिला तास “गोल्डन अवर” म्हणून ओळखला जातो, ज्या दरम्यान जखमी व्यक्तीला त्वरित आणि योग्य उपचार मिळाल्यास वाचण्याची सर्वाधिक शक्यता असते. जास्त वाहतुकीमुळे किंवा अपघातस्थळी पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेमुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास अनेकदा उशीर करतात. अशावेळी हि हेलिकॉप्टर सेवा रुग्णांसाठी वरदान ठरू शकते. ही हेलिकॉप्टर सेवा “बुक युअर हेलिकॉप्टर” नावाच्या कंपनीने सुरू केली आहे. Helicopter Service On Mumbai Delhi Expressway

याबाबत कंपनीचे प्रवक्ते मनीष कुमार सुनारी यांनी सांगितले की, या हेलिकॉप्टर सेवेचा प्राथमिक उद्देश अपघातग्रस्तांना घटनास्थळावरून जवळच्या मोठ्या आणि सुसज्ज रुग्णालयात पोहोचवणे आहे. ही सेवा “गोल्डन अवर” मध्ये वैद्यकीय मदत करेल, ज्यामुळे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होईल. हा उपक्रम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या देशातील एक्सप्रेसवे आंतरराष्ट्रीय मानकांवर आणण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करतो.

काय आहेत वैशिट्ये ? Helicopter Service On Mumbai Delhi Expressway

दरम्यान, 9 मार्च 2019 रोजी मुंबई ते दिल्ली एक्स्प्रेस वेच्या बांधकामास परिवहनमंत्री नितीन गडकरी, अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला होता. या एक्सप्रेसवेची एकूण लांबी १,३८६ किलोमीटर आहे. या महामार्गामुळे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तौडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, सूरत या शहरांत जाणे-येणे सोपे होईल. दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ सुमारे २४ तासांवरून केवळ १२ तासांवर येईल.लवकरच हेलिपॅड सेवेचा दुसरा टप्पा सुरू होणार असून, तो राजस्थान पर्यटन विभागाच्या सहकार्याने राबवला जाणार आहे. या टप्प्यात सरिस्का अभयारण्य, अरवली पर्वतरांगा, ऐतिहासिक किल्ले आणि प्रमुख पर्यटन स्थळे यांना जॉय राईड्स आणि एरियल टूरद्वारे जोडले जाणार आहे.