बीड, प्रतिनिधी नितीन चव्हाण : डेनीस केम लॅब कंपनीच्या सलाईमध्ये शेवाळ आढळून आले होते, हा सगळा प्रकार हॅलो महाराष्ट्र न्यूज पोर्टलने उघडकीस आणला होता, या प्रकाराची तात्काळ दखल घेवून जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी घेत. राज्य शासनाला पत्रव्यवहार करून संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती, त्यावर 24 तासाच्या आत आरोग्य मंत्र्यांनीही तात्काळ ठोस पावले उचलून सदर कंपनीच्या सलाईच्या बाटल्या कायमस्वरूपी बंद केल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य मंत्र्यांनी सदर कंपनीवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.
आरोग्य विभागात कोण कधी काय करेल हे निश्चित सांगता येत नाही त्यातही शासकिय रुग्णालय म्हटले की अधिकच तसेच बीड जिल्हा रूग्णालयाच्या नेत्र विभागात डेनीस केम लॅब कंपनीच्या सलाईनच्या बाटल्यांमध्ये शेवाळ आढळून आले होते. हा सगळा प्रकार हॅलो महाराष्ट्र न्यूज पोर्टलने 29 जानेवारीला उघडकीस आणला होता, त्यावर जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी तात्काळ दखल घेवून राज्य सरकारला कडक कारवाई करण्यासाठी पत्र पाठविले, त्यानुसार आरोग्य मंत्र्यांनीही याची गांर्भियाने दखल घेत सदर कंपनीच्या सलाईनच्या बाटल्या बंद केल्या, सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य मंत्र्यांनी सदर कंपनीवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.