कर्नाटकातील हिजाब वादावर हेमा मालिनीचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कर्नाटक सध्या हिजाब प्रकरणावरून चालू असलेले वाद हे दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहेत. त्यातच आता भाजप खासदार असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत शाळेत हिजाब घालण्याला विरोध केला आहे. शिवाय त्यांनी म्हटले कि शाळेत गणवेशच घालायला हवा. यामुळे कदाचित हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या शाळा या शिक्षणासाठी असून तेथे धार्मिक बाबी घेऊ नये, असे त्यांनी सांगितले. हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, प्रत्येक शाळेत गणवेश असतो ज्याचा आदर केला पाहिजे. शाळेच्या बाहेर तुम्हाला हवे ते घालता येते.शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही
.
प्रत्येक शाळेचा एक गणवेश हा निश्चित ठरलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाने त्या गणवेशाचा सन्मान करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे. याबाबत तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा. अशा आशयाची प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण-
जानेवारी महिन्यामध्ये कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला होता. येथील एका ज्युनिअर कॉलेजमधील ६ विद्यार्थिनींना त्यांनी हिजाब परिधान केल्यामुळे शिक्षण घेण्याकरिता वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. तर ड्रेसमध्ये समानता यावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे कॉलेज प्रशासनाने म्हटले होते. यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हा वाद वाढत गेला. हिजाबच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी भगवी शाल आणि भगवे फेटे परिधान करून शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचताना दिसू लागले आहेत. तर हिजाब परीधान केलेल्या युवतीला कॉलेजमध्ये पाहताच या तरुणांनी अतिशय आक्रमकरीत्या जय श्री राम अश्या घोषणा दिल्या. शिवाय त्या तरुणीने ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत या जमावाला प्रत्युत्तर दिले.

Leave a Comment