बांसवाडा (राजस्थान) | ‘मी जर ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री बनू शकते परंतु मुख्यमंत्री बनल्यानंतर स्वातंत्र्यावर बंधने येतात म्हणून मी हा निर्णय घेत नाही’ असे वक्तव्य प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपा नेत्या हेमा मालिनी यांनी केले आहे. हेमा मालिनी बांसवाडा येथे आल्या असता एका स्थानिक पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत असताना त्यांनी असे विधान केले आहे.
हेमा मालिनी या भाजपच्या खासदार आहेत. त्या मथुरेतून लोकसभेवर निवडून आल्या आहेत. हेमा मालिनी यांच्या उत्तराचा रोख उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाकडे होता. हेमा मालिनी या भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्या आहेत. भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून ही त्या ओळखल्या जातात.