गुलाबराव पाटलांकडून रस्त्याची तुलना हेमा मालिनीच्या गालांशी, आता खुद्द हेमा मालिनींनी दिले ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या मतदार संघातील रस्त्यांची तुलना थेट अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केल्यानंतर शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून विरोधकांनी गुलाबराव पाटलांवर सडकून टीका केल्यानंतर खुद्द हेमा मालिनी यांना याबाबत विचारले असता हे अतिशय चुकीचं असून एखाद्या नेत्याने अस बोलणं योग्य नाही असे त्या म्हणाल्या.

हेमा मालिनी म्हणाल्या, मला माझ्या गालांची आता अधिक काळजी घेतली पाहिजे अस म्हणत आधी हेमा मालिनी हसल्या म्हणाल्या. पण चेष्टेचा भाग सोडा. आपल्या गालांबाबत यापूर्वी लालू प्रसाद यादव यांनी काही वर्षांपूर्वी वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून अशा प्रकारच्या वक्तव्यांचा ट्रेंड सुरू आहे. बहुतेक सर्वच जण अशा प्रकारे सहज बोलून जातात. अशाच प्रकारे ते ही (गुलाबराव पाटील) बोलले असतील. पण हे अतिशय चुकीचं आहे. सामान्य माणूस बोलत असेल तर त्यावर फार काही करू शकत नाही. पण एखादा बडा नेता आणि मंत्री असं बोलत असेल तर ते अजिबात योग्य नाही. कुठल्याही महिलेची तुलना किंवा तिच्या नावाचा उपयोग वक्तव्यांसाठी केला जाऊ नये, असं हेमा मालिनी म्हणाल्या.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले-

गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना म्हंटल होत की, गेली 30 वर्षे ते या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्ते करु शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा हेमा मालिनीच्या गालासारखे सुंदर रस्ते आम्ही केले आहेत, असं वक्तव्य पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.

Leave a Comment