“मी घरात, बाहेर अंर्तवस्त्र घालायचं की नाही हा माझा प्रश्न” हेमांगी कवीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपल्या अनोख्या आणि दमदार अभिनयाने आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगी कवी सध्या आपल्या फेसबुक पोस्टमुळे फारच चर्चेत आली आहे. एका संवेदनशील विषयावर सडेतोड उत्तर देत तिने ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे. हेमांगीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओवर तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हेमांगीने एक पोस्ट शेअर करत या नेटकऱ्यांची बोलती बंद केलीय.

हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओवर अनेकांनी तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं होतं. त्याच ट्रोलर्ससाठी हेमांगीने ही पोस्ट लिहिली आहे.यामध्ये ती म्हणाली “हो मला स्तन आहेत. त्याला स्तनाग्रेही आहेत अगदी पुरुषांसारखी! जसे चालताना माझे हातपाय हलतात तसचे काम करताना माझे स्तन हलतात. कारण मी सस्तन प्राणी आहे. मादी आहे! ज्यांचे हलत नाहीत अशांना माझा त्रिवार सलाम. आता मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची कि नाही ही माझी पंसत आहे.” तसेच ती पुढे म्हणाली, “या व्हिडीओत दिसणारे माझे स्तन आणि स्तनाग्रे, त्यावरून मला जज करण्याचा, अश्लिलतेचा, माझ्या संस्कारांचा माझ्या बुद्धीमत्तेचा, माझ्या इमेज विषयी घाणेरड्या चर्चा, गॉसिप करून जो काय संबध जोडताय ती तुमची पसंती” असे म्हणत तिने ट्रोलर्सचा पुरता समाचार घेतला आहे.

हेमांगी कवीने तिच्या इन्स्टाग्रामवर गोल पोळ्या कशा कराव्या याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तसेच तिने तिच्या इन्स्ट स्टोरीच्या पोस्टमध्ये पुन्हा एक तळटीप दिली आहे. यामध्ये ती “मला डायरेक्ट मेसेज करून माझ्या विषय काळजी दाखवणाऱ्या हितचिंतकांनो..चिल… या एवढ्या चिंधी गोष्टीवरुन मला अनफॉलो करावसं वाटतं असेल तर खुशार करावं. विचित्र विचारांचे फॉलोअर्स नसलेलं कधीही चांगल” असे म्हणाली आहे. ट्रोल करणाऱ्यांला सडेतोड उत्तर देण्याची हेमांगीची ही पहिलीच वेळ नाहीतर या अगोदरदेखील तिने अनेकदा ट्रोलर्सची बोलती बंद केलीय. तिने आताच्या पोस्टमधून स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आणि स्त्रियांविषयी नेहमीच दूषित वृत्ती ठेवणाऱ्याना हेमांगी कवीने चांगलेच उत्तर दिली आहे.

Leave a Comment