मुंबई | बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात… या जनावरांसाठी गोळ्याच! हिंम्मत नाही झाली पाहिजे परत!’ असा संताप अभिनेता हेमंत ढोमे याने ट्विट करून व्यक्त केला आहे. पिंपरीतील काळेाडी येथे पोलिसांना मारहाण करण्यात आली. यावर त्याने आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हेमंत चे वडील ही पोलिस दलात होते. मात्र ते काही दिवसापूर्वी निवृत्त झाले आहेत.
दरम्यान राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशानस, पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी सारेच एकजुटीने काम करत आहेत. मात्र अशा परिस्थितीत या करोना योद्ध्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यावरच प्राणघातक हल्ले होत आहेत. राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशानस, पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी सारेच एकजुटीने काम करत आहेत. मात्र अशा परिस्थितीत या करोना योद्ध्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यावरच प्राणघातक हल्ले होत आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अनेक पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले आहेत.त्यामुळे हेमंत ढोने संतापला आहे.
https://twitter.com/hemantdhome21/status/1254890291149991937
भाजी मार्केटमध्ये गर्दी झाल्याची माहिती समजल्याने तेथे जाऊन फळविक्रेत्याला आणि लोकांना हटकणाऱ्या पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याच्यावर हेमंत ढोने याने आपला संताप व्यक्त केला आहे.