हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांना ईडीकडून बुधवारी संध्याकाळी अटक करण्यात आले आहे. त्यानुसार, आज त्यांना ईडीने न्यायालयात हजर केले. मात्र न्यायालयाने सोरेन यांच्या कोठडीचा निर्णय राखून ठेवला आहे. मुख्य म्हणजे, जमीन घोटाळा प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या पार पडणार आहे. यामुळेच आता हेमंत सोरेन यांची आजची रात्र कोठडीत जाणार आहे.
ईडीने केलेल्या कारवाईनंतर हेमंत सोरेने फरार झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र बुधवारी रात्री त्यांना ईडीने ताब्यात घेतले. त्यानंतर आज ईडीकडून सोरेने यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ईडीने सोरेन यांना दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु रांची न्यायालयाने हा आदेश राखून ठेवला आहे. त्यामुळे सोरेने यांना आणखीन एक रात्र न्यायालयीन कोठडीत काढावी लागणार आहे.
दरम्यान, जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने हेमंत सोरेने यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळेच सोरेन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे, ईडीच्या कारवाईनंतर सोरेने गायब झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. तर दुसऱ्या बाजूला हेमंत सोरेन यांना शोधून देणाऱ्या व्यक्तीला इनाम देण्यात येईल अशी घोषणा भाजपचे नेते बाबूलाल मरांडी यांनी केले होते. मात्र गेल्या दोन दिवसात या घडामोडी घडल्यानंतर सध्या हेमंत सोरेने ईडीच्या ताब्यात आहेत.