हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लहानपणापासून कोंबडी आधी कि अंडे आधी हा प्रश्न तुम्ही ऐकत असाल. यावर विचार करून तुमचंही डोकं उठलं असेल. कधी कधी तुम्ही या प्रश्नावरून अनेकांशी वाद- विवादही घातला असेल. परंतु अनेक तर्क – वितर्क लावूनही या जगात अंडे आधी आले का कोंबडी आधी आली याचे समाधानकारक उत्तर आपल्याला मिळाले नाही. आता मात्र संशोधकांनी पुराव्यासहित याचे उत्तर शोधलं आहे. जगात अंडे नव्हे तर कोंबडीच आधी आली असा दावा संशोधकांनी केला आहे.
ब्रिस्टल विद्यापीठातील संशोधकांनी कोंबडी आधी कि अंडे आधी या विषयावर अत्यंत खोलात जाऊन संशोधन केले. त्यांनी केलेल्या संशोधनानूसार आधी अंडी नसून कोंबडी जगात प्रथम आली होती. ते कस याच कारणही सांगण्यात आलं आहे. हजारो वर्षांपूर्वी कोंबडा, कोंबडी आतासारखे नव्हते. त्यावेळी कोंबडी अंडी द्यायची नाही, तर पूर्णपणे पिल्लाला जन्म द्यायची. मात्र, हळूहळू त्यांचा पॅटर्न बदलला. पिल्लाला जन्म देण्याच्या कोंबडा-कोंबडीमध्ये अंडं देण्याची क्षमता विकसित झाली. त्यानंतर बाळाला जन्म देणारी कोंबडी अंडी घालू लागली असा दावा संशोधकांनी केला आहे. त्यामुळे आधी कोंबडीच हे स्पष्ट झालं आहे.
अंडी देण आणि गर्भधारणा यामध्ये फरक आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की प्रजननक्षमतेतील फरक वाढीव गर्भधारणेमुळे होतो. पक्षी, मगरी आणि कासव अशी अंडी घालतात, ज्यामध्ये गर्भ अजिबात तयार होत नाही, तो नंतर तयार होतो. तर काही जीव असे आहेत जे गर्भाच्या विकासासोबत आतून अंडी घालतात. साप आणि सरडे जरी अंडी घालत असले तरी ते पिल्लांना जन्म देऊ शकतात कारण त्यांना उबवण्याची गरज नसते.