हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अनियमित मासिक पाळीमुळे तसेच मासिक पाळीची तारीख जवळ आल्यामुळे आणि अशा अनेक विविध कारणांमुळे शरीरातील हार्मोन्सममध्ये बदल होत राहतात. परंतु महिलांच्या हार्मोन्समध्ये बिघाड (Hormonal changes) झाला की त्याचे परिणाम दैनंदिन जीवनशैलीवर देखील होतात. यामुळे तणाव वाढणे, सतत चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांसह इतरही अनेक लक्षणे असतात जी आपल्याला हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्याचे संकेत देतात. आज आपण याचविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
1) वजन वाढणे किंवा कमी होणे – योग्य आहार असताना देखील अचानक वजन वाढले किंवा कमी झाले तर ते हार्मोन्स बिघडण्याची लक्षणे असू शकतात. तुम्हाला असे काही जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचे उपचार घ्या.
2) मूड स्विंग्स – हार्मोन्सच्या असंतुलनामुळे सतत चिडचिड होणे, राग येणे, अचानक आनंदी वाढणे किंवा नैराश्य येणे अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. अशा गोष्टी जाणवायला लागल्यास एक डायरी तयार करून त्यामध्ये या सर्व बाबी लिहून ठेवा. याबरोबर डॉक्टरांचा किंवा समुपदेशकांचा सल्ला घ्या.
3) थकवा जाणवणे – शरीरातील हार्मोन्समध्ये बिघाड झाल्यास आतून थकवा जाणवायला सुरुवात होते. तसेच कोणतेच काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होत नाही. किंवा एखाद्या काम करताना उत्साह वाटत नाही. ही लक्षणे देखील हार्मोन्स असंतुलनाची असू शकतात.
4) झोपेचा त्रास होणे – निद्रानाश होणे , वेळेत झोप न लागणे, झोपल्यानंतर अस्वस्थ वाटणे ही अशी लक्षणे हार्मोन्सच्या असंतुलनाची असू शकतात. असे जाणवल्यास स्लीप जर्नल ठेवा. झोपेची नियमित दिनचर्या तयार करा. असे उपाय करून देखील फरक पडत नसेल तर यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
5) केस गळती होणे – सतत केस गळत असतील किंवा केस पातळ होण्यास सुरुवात झाली असेल तर हे लक्षणे हार्मोन्स बदलायची असू शकतात. यासोबत चेहऱ्यावर अतिरिक्त पिंपल यायला सुरुवात झाली तर हार्मोनल बदलांमुळे असे होऊ शकते. अशावेळी कोणतेही घरगुती उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही योग्य ठरते.