Credit Card स्मार्टपणे वापरण्याचे गणित अशा प्रकारे समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत. तसेच ते खूप उपयोगी देखील आहे. मात्र त्याचा योग्य पद्धतीने वापर केला गेला नाही तर ते नुकसानीचेही ठरेल. जर तुम्ही त्याची थकबाकी वेळेवर भरली नाही तर ते त्यावर भरपूर व्याज देखील भरावे लागेल. यासाठी क्रेडिट कार्डमागील गणित नीट समजून घेतल्यास त्यावर योग्यपणे नियंत्रण ठेवता येईल. त्यासाठी क्रेडिट कार्ड म्हणजे काय हे नीटपणे समजून घ्यायला हवे. Credit Card

क्रेडिट कार्डचे उच्च व्याजदर आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. समजा तुमच्या क्रेडिट कार्डची थकबाकी रुपये 60,000 आहे आणि किमान देय रक्कम रुपये 3,000 आहे. आता तुमच्याकडे असे पर्याय असतील…

1. तुम्ही देय तारखेपूर्वी 60,000 रुपयांचे पूर्ण पेमेंट करू शकता.
2. तुम्ही देय तारखेपूर्वी किमान 3,000 रुपयांचे पेमेंट करू शकता.
3. तुम्ही काहीही पैसे देत नाही (हा पर्याय कधीही निवडू नका).

आता वर उल्लेख केलेल्या प्रकरणांमध्ये काय होईल ते समजून घ्या
1. जर तुम्ही सर्व थकबाकी भरली असेल तर कोणतेही व्याज भरावे लागणार नाही.
2. तुम्ही 60,000 रुपयांपैकी 3,000 रुपये भरले असल्यामुळे महिन्यासाठी 57000 रुपयांवर व्याज आकारले जाईल.
3. संपूर्ण 60,000 रुपयांवर व्याज आकारले जाईल. यासह, तुम्ही किमान देय रक्कम (3,000 रुपये) भरली नसल्यामुळे लेट फीस देखील आकारले जाईल.

जास्त व्याज देण्यापासून वाचण्यासाठी काय उपाय आहेत?
एकाच वेळी अनेक क्रेडिट कार्डे कधीही घेऊ नका. तसेच, बेजबाबदारपणाने खर्च करणे टाळा. तसेच वेळेवर बिल पूर्ण भरण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या खर्च करण्यावर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर कमी करा. तुम्ही ताबडतोब पैसे देऊ शकाल इतकाच खर्च करा.

क्रेडिट कार्डमध्ये मिनिमम ड्यू अमाउंट देता येईल. तुमचे कार्ड खाते नियमित ठेवण्यासाठी देय तारखेपूर्वी भरावी लागणारी ही किमान रक्कम आहे. ही रक्कम भरून, तुम्ही लेट पेमेंट फी आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होणारा नकारात्मक परिणाम टाळता.

मात्र, किमान रक्कम भरल्यानंतरही तुम्हाला थकीत रकमेवर व्याज द्यावे लागेल, यात शंका नाही. हे लक्षात असू द्या की, क्रेडिट कार्डवर वार्षिकरित्या सुमारे 40 टक्के व्याज आकारले जाऊ शकते.

Leave a Comment