हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री मधील सर्वांची आवडीची कंपनी असलेल्या हिरोने आपली Passion Plus पुन्हा एकदा नव्याने लाँच केली आहे. यापूर्वीही कंपनीने ही गाडी बाजारात आणली होती, परंतु त्यानंतर काही काळ ती बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा अपडेटेड फीचर्स आणि नव्या इंजिन सह हिरोने आपली Passion Plus भारतीय बाजारात लाँच केली आहे. ही बाईक स्प्लेंडर प्लसला जोरदार टक्कर देईल. चला आज आपण जाणून घेऊया कंपनीने Passion Plus मध्ये नेमके काय बदल केले आहेत, आणि या गाडीची किंमत किती ठेवण्यात आली आहे याबाबत….
हिरोच्या या अपडेटेड Passion Plus चे वजन 115 किलोग्रॅम असून यामध्ये तुम्हाला 11 लीटर क्षमतेची इंधन टाकी मिळते. बाईकच्या आकाराबाबत सांगायचं झाल्यास नव्या Passion Plus ची लांबी 1,982 मिमी, रुंदी 770 मिमी आणि उंची 1,087 मिमी आहे. गाडीच्या सीटची उंची 790 मिमी आहे, या बाईकला 168 मिमीचा ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. त्यामुळे खराब आणि खडबडीत रस्त्यावर चालवताना सुद्धा कसलाही त्रास होत नाही .
इंजिन किती –
हिरोच्या या अपडेटेड Passion Plus मध्ये कंपनीने 97.2cc चे सिंगल-सिलेंडर, एअर कूल्ड, फ्युएल इंजेक्टेड इंजिन दिले आहे. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सला जोडलेले असून 8,000 rpm वर 7.91 bhp पॉवर आणि 6,000 rpm वर 8.05 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. नव्या पॅशन प्लस मध्ये फ्युएल इंजेक्शन सिस्टीम सुद्धा उपलब्ध असून यामुळे गाडीला चांगलं मायलेज मिळू शकत.
ब्रेकिंग आणि सस्पेन्शन –
नव्या पॅशन प्लेस मध्ये सेल्फ आणि किक स्टार्टर मिळतोय. बाईकला 80/100 R18 ट्यूबलेस टायर्ससह 18-इंच अलॉय व्हील आहेत. ब्रेकिंग आणि सस्पेन्शनबाबत सांगायचं झाल्यास, बाईकला डबल क्रॅडल फ्रेम सस्पेन्शन मिळते. पुढील बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागच्या बाजूला ट्विन ट्यूब शॉक ऍब्जॉर्बर्स आहेत. ब्रेकिंगसाठी, समोर आणि मागील दोन्ही बाजूस 130 मिमी डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
किंमत किती?
नवीन हीरो पॅशन प्लसची किंमत भारतीय बाजारात 76,301 रुपये ठेवण्यात आली आहे. ही एक्स शोरूम किंमत आहे. तुम्ही ही नवीन पॅशन प्लस स्पोर्ट्स रेड, ब्लॅक नेक्सस ब्लू आणि ब्लॅक हेवी ग्रे या ३ रंगांमध्ये खरेदी करू शकता.