Hero ने लॉन्च केली नवी 160cc Bike; पहा फीचर्स आणि किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची टू व्हिलर उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन 160cc Bike Hero Xtreme 160R 4V लाँच केली आहे. अतिशय स्पोर्टी लूक असलेली ही बाईक तरुणांना नक्कीच आकर्षित करेल यात शंकाच नाही. Hero Xtreme 160R 4V चा थेट सामना TVS Apache RTR 160 4V आणि Bajaj Pulsar NS160 या गाड्यांशी होईल. हिरो च्या या बाइकमध्ये नेमकी काय वैशिष्टये आहेत आणि कंपनीने तिची किंमत किती ठेवली आहे याबाबत आज आम्ही सविस्तर माहिती सांगणार आहोत.

इंजिन –

Hero Xtreme 160R 4V मध्ये कंपनीने 160 cc ऑइल एअर कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 14.6 न्यूटन मीटर टॉर्कसह 16.6 bhp पॉवर देते. या इंजिनला ४ व्हॉल्व्ह मिळालेअसल्याने बाईकच्या नावातच 4V असं म्हंटल आहे. ही गाडी हिच्या जबरदस्त वेगासाठी ओळखली जाईल. कारण Hero Xtreme 160R 4V अवघ्या 4.41 सेकंदात 0 ते 100 किलोमीटरचा वेग गाठते. त्यामुळे हिरोची ही बाईक त्याच्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान बाइक्सपैकी एक आहे.

फीचर्स –

बाईकच्या फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये 12-लिटरची इंधन टाकी मिळते. आणि गाडीला स्प्लिट शीट देण्यात आली आहे. तसेच Hero Xtreme 160R 4V मध्ये तुम्हाला अपडेटिड डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 17 इंची अलॉय व्हील, ट्यूबलेस टायर, एलईडी हेडलाइट्ससह LED DRLs, ब्लूटूथ, बॅटरी हेल्थ, सर्व्हिस अलर्ट यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती?

कंपनीने Hero Xtreme 160R 4V ही बाईक ३ व्हेरिएन्ट मध्ये आणली आहे. त्यानुसार, गाडीची किंमत तिच्या व्हेरिएन्ट नुसार वेगवेगळी आहे. यातील स्टँडर्ड व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.27 लाख रुपये, कनेक्टेड व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1.32 रुपये आणि प्रो व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1.36 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून या दमदार बाईकची डिलिव्हरी सुरू होईल.