हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाने घरच्या मैदानावर इंग्लंडचा 3-1 असा पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांची बॅट न तळपता देखील भारतीय संघाने देदीप्यमान यश मिळवले. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयामागे 5 खेळाडूंची दमदार कामगिरी आहे. पाहुयात कोण आहेत हे खेळाडू –
रोहित शर्मा –
रोहित शर्मा पुन्हा एकदा भारतीय टीमचा आधारस्तंभ असल्याचं सिद्ध झालं. रोहितने चार मॅचमध्ये 345 रन्स ठोकले. ज्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे विराट रहाणे आणि पुजाराची बॅट शांत असताना रोहितने मात्र प्रत्येक वेळी झुंजार खेळी केली.
अक्षर पटेल –
या मालिकेतून कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण करणाऱ्या डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने तर इंग्लिश फलंदाजांना अक्षरशः आपल्या तालावर नाचवले त्याने या मालिकेतील एकूण 27 विकेट्स घेत इंग्लंडचे कंबरडे मोडलं.
आर अश्विन –
अष्टपैलू असावा तर आर अश्विन सारखा. अश्विनने या एकूण 4 टेस्ट मॅचमध्ये 14. 72 सरासरीने एकूण 32 विकेट्स पटकावल्या. अश्विनने या सीरिजमध्ये 400 विकेट्सचा टप्पा पार केला. तसेच संघाला गरज असताना फलंदाजी मधेही दम दाखवत जोरदार शतकही झळकावले.
रिषभ पंत –
टीम इंडियाचा विकेट कीपर बॅट्समन रिषभ पंतने बॅटिंग आणि कीपिंगमध्येही जलवा दाखवला. या सिरीजमध्ये 54 च्या सरासरीने त्याने 270 रन्स काढले तर स्टंपच्या मागेही त्याने चमक दाखवली. 13 फलंदाजांना त्याने माघारी धाडलं. पीचने करामत दाखवायला सुरुवात केल्यानंतर त्याने 8 झेल पकडले तर 5 स्टम्पिंग केल्या.
वॉशिंग्टन सुंदर –
वॉशिंग्टन सुंदरने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही मध्ये चमक दाखवली. जेव्हा जेव्हा संघाला त्याच्या फलंदाजीची नितांत गरज होती तेव्हा तेव्हा वॉशिंग्टन संघासाठी धावून आला. 2 वेळा त्याच शकत हुकल असलं तरी आपल्या झुंजार खेळीने त्याने चाहत्यांची मने मात्र नक्कीच जिंकली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’