Hidden Sign Of Cholesterol | चांगले आयुष्य जगण्यासाठी आपले आरोग्य देखील तितकेच निरोगी असणे खूप गरजेचे असते. अनेकदा आपल्याला शरीरासंबंधी अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा आपण कॉलेस्ट्रॉल (Hidden Sign Of Cholesterol) हे शब्द ऐकलेले आहेत. साखर, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल जास्त झाल्याने आपल्याला अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. आजकाल अनेक असतील लोक आहेत, त्यांना लहान वयातही या समस्या उद्भवताना दिसत आहेत. लोकांचे जीवनशैली बदलली आहे. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत व्यायाम देखील ते वेळेवर करत नाही. आणि त्यामुळे या गोष्टींचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत आहे. म्हणूनच मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकाऱ्यांसारख्या समस्या उद्भवत आहे. वयाची तिशी पूर्ण होण्याआधीच तरुण वयात लोकांना कोलेस्ट्रॉल तसेच उच्च रक्तदाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
परंतु हे आजार होताना आपल्याला सुरुवातीला काही लक्षणे दिसत असतात. ती लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे असते. आणि डॉक्टरांकडून तपासणी केली असेल, त्यातील कोलेस्ट्रॉल ही अगदी सामान्य अशी गोष्ट आहे की, ज्याची लक्षणे सुरुवातीला काहीच दिसत नाही. परंतु पुढे जाऊन याचे खूप मोठ्या आजारात रूपांतर होते. आणि त्यानंतर आपल्याला समजते की, आपल्याला कोलेस्ट्रॉल झालेला आहे. कोलेस्ट्रॉल म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला एक प्रकारचा थर जमा होतो. त्यामुळे रक्ताचे संक्रमण होण्यास अडथळा निर्माण होतो. आणि आपल्या हृदयाला रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा देखील कमी प्रमाणात होतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.
म्हणूनच आपण वेळोवेळी आपल्या आरोग्याची चाचणी करून घेणे खूप गरजेचे असते. त्यामुळे कोलेस्ट्रोल वाढवले वाढले आहे की नाही, हे समजण्यासाठी सुरुवातीला काही नकळत अशी लक्षणे दिसतात. ती ओळखणे खूप गरजेचे आहे. आणि त्यानुसारच तुम्ही उपचार घ्यायला पाहिजे. आता ही लक्षणे नेमकी कोणती आहे की आपण जाणून घेणार आहोत.
कोलेस्ट्रॉल झाल्याचे लक्षणे | Hidden Sign Of Cholesterol
- डोळ्याच्या बाजूला डाग दिसतात.
- जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स 28 पेक्षा जास्त येतो.
- थोडं जरी चाललो तरी आपल्याला दम लागतो आणि धाप लागते.
- छाती काही वेळाने दुखते आणि आपल्याला अस्वस्थ वाटते.
- यापैकी जर कोणतीही लक्षणे तुम्हाला दिसत असेल, तर तुम्ही लवकरच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि लवकरच औषध उपचार सुरू करा. तसेच तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत देखील बदल करा. जर सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच आपण ही लक्षणे ओळखून त्यावर उपचार घेतले, तर आपल्याला नक्कीच कोलेस्ट्रॉलवर विजय मिळवता येतो.