कोरोनाबाधितांचा लपवून अंत्यविधी आला अंगलट, पाचजण कोरोना पॉझिटिव्ह

अंत्यसंस्काराला उपस्थितीत सर्वाची झोपच उडाली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आजारपणातून आराम मिळावा म्हणुन परगावी लेकीने नेलेल्या येथील एका ७८ वर्षीय वयोवृध्द महिलेला लोणंदमध्ये कोरोनाची बाधा झाली. पुढील उपचारासाठी तिला कोरोना हॅास्पीटल नेताना तिचा वाटेतच मृत्यु झाला. हा प्रकार नातेवाईकांनी लपवून विंगला आणुन अंत्यसंस्कार तिच्यावर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून नातेवाईक व अंत्यविधीला उपस्थीत ४० जणांची कोरोना चाचणी आरोग्य विभागाने केली असून त्यात एका लहान मुलीसह तीन पुरूष अन्य एक महिला कोरोना बाधीत आढळली आहे. चार महिन्यानंतर कोरोनाने गावात पुन्हा शिरकाव त्यामुळे केला असून विंगमध्ये धाकधूक आणखी वाढली आहे.

याबाबत आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती अशी, विंग (ता. कराड) येथील ७८ वर्षिय वयोवृध्द महिला मागील आठवड्यात घरात घसरून पडली, तेव्हा त्या जखमी झाली. वृध्देला आराम मिळावा म्हणून लेकीने उपचारासाठी तिला परगावी नेले. लोणंद (ता. खंडाळा) येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार दिले. संशयित म्हणून स्वॅब तपासणी केली. रूग्णाची हालत बघून तेथील डॅाक्टरानी पुढील उपचारासाठी कोव्हीड रूग्णालयात हालवण्यास सांगितले. प्रवासादरम्यान वाटेतच तिचा मृत्यु झाला. सोमवारी रात्री उशीरा घटना घडली.

वृध्देचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी ही बाब मात्र लपवली. खाजगी रूग्णवाहिकेतून मृतदेह मुळगावी विंग येथे आणला. तिच्यावर मंगळवारी सकाळी विधीवत अंत्यसंस्कार केले. तिचा मृत्यु नेमका कशामुळे झाला. येथील आरोग्य विभागाने घेतलेल्या माहितीनंतर ती कोरोना बाधित असल्याचे बुधवारी समजले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईकानी ही बाब का लपवली, असा अरोप आरोग्य विभागाने केला आहे. प्रशासनाला गाफील का ठेवले, असा प्रश्न केला आहे. प्रशासनासह अंत्यसंस्काराला उपस्थीत सर्वाची झोपच त्यामुळे उडाली आहे. चार महिन्यानंतर गावात कोरोनाचा शिरकाव त्यामुळे झाला आहे. प्रतिबंध म्हणून प्रशासनाने काल गुरूवारी येथे कोळे प्राथमीक केंद्राअंतर्गत अर्टिफिशीअर कॅम्प येथे घेतला. त्यात ४० जणांची टेस्ट केली.

नातेवाईकासह विधीला उपस्थीत ग्रामस्थांचा समावेश त्यात केला होता. त्यामध्ये एक ९ वर्षाची लहान मुलगी एक महिलेसह अन्य तीन पुरूष बाधीत आढळले आहेत. पुरूषात एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा समावेश आहे. गावात अन्य दोन ठिकाणी एक महिला व पुरूष बाधित व्यक्ती सापडल्या असून एकूण संख्या आता ७ झाली आहे. असे स्थानिक आरोग्य विभागाने माहिती देताना सांगितले. त्यामुळे पेच अणखी वाढला आहे. तब्बल चार महिन्यानंतर गावात कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य विभाग अणि प्रशासनापुढे पेच अणखी वाढला आहे. त्या परिसरात प्रतिबंधात्मक उपायोजना हाती घेतल्या आहेत. त्यासाठी स्थानिक प्रशासन अणखी सतर्क झाले आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like