High Blood Pressure Diet | उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीया पदार्थांचा करा जेवणात समावेश, वाचा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

High Blood Pressure Diet | आपल्या जीवनशैलीवर आपले आरोग्य अवलंबून असते. आपला आहार जर चांगला असेल तर आपल्या आरोग्य देखील चांगले राहते. आज काल रक्तदाबाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आणि त्यापासून मुक्तता मिळवायचे असेल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. तुम्हाला हलका आहार घ्यावा लागतो त्याप्रमाणे दैनंदिन व्यायाम देखील करावा लागतो. या रक्तदाबाला हायपर टेन्शन असे म्हणतात यापासून हृदयविकाराचा धोका देखील मोठ्या प्रमाणात येऊ.

आपल्या जगभरात पाहिले तर शंभर कोटींपेक्षा अधिक लोकांना उच्च रक्तदाब अशा समस्या आहेत. निरोगी व्यक्तीचा रक्तदाबहार 120 ते 80 च्या दरम्यान असतो. परंतु हा जर वाढला तर अनेक गोष्टी उद्भवू शकतात. तर आज आपण पाहणार आहोत की रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमच्या आहारात पालक, कोबी, काळे, एका जातीची बडीशेप आणि लेट्यूस यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करू शकता. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.दही-

दही | High Blood Pressure Diet

रोज दही खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. दही उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमच्या आहारात लो फॅट दह्याचा समावेश करू शकता.

हेही वाचा- Cameron Airpark : ऐकलं का? ‘या’ शहरात प्रत्येकाकडे आहे खासगी विमान; घराघरांत केलंय हँगरचं बांधकाम

किवी

किवी व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो. किवीचे दररोज सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय किवीचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

लसूण

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात लसणाचा समावेश करावा. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी हे उपयुक्त आहे. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाऊ शकता.