High Blood Pressure | तुम्हालाही उच्च रक्तदाबची समस्या असेल, तर करा हे घरगुती उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

High Blood Pressure | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीचा नकारात्मक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. यातीलच एक गंभीर आजार म्हणजे उच्च रक्तदाब. अनेक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे. आणि अशा लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येते. लोकांची जीवनशैली तसेच आहारात नियमितता नसल्याने तसेच फास्ट फूड जास्त प्रमाणात खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होतो.

ही समस्यापूर्वी वाढत्या वयात आल्यानंतर लोकांमध्ये दिसत होती. परंतु आजकाल अनेक तरुण लोकांना देखील उच्च रक्तदाबाच्या समस्या दिसून येते. 120 / 80 हा रक्तदाब सामान्य रक्तदाब मानला जातो. जर तुमचा रक्तदाब 140 / 90 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

ज्या लोकांचा रक्तदाब वाढलेला असतो. त्या लोकांना काही औषधी दिले जातात. तसेच आहारामध्ये देखील अनेक नियम असतात. रक्तदाबाची ही औषधे अनेक वर्ष खायला सांगतात. परंतु तुम्ही अगदी घरगुती काही पद्धतींचा अवलंब करून देखील तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवू शकता. हे घरगुती उपाय रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतील.

व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करा | High Blood Pressure

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी दररोज विटामिन सी असलेले पदार्थ खाणे गरजेचे असते. विटामिन सी असलेले पदार्थ रक्तदाबाची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच विटामिन सी हा एक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांमधील दाब कमी होतो. तुम्ही दररोज लिंबू, संत्री, पालक, टोमॅटो, हिरव्या पाले भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.

जेवणात मिठाचे प्रमाण कमी करा

तुम्ही जर तुमच्या जेवणात मिठाचे प्रमाण कमी केले, तरी देखील तुम्ही रक्तदाब नियंत्रित करू शकता. जेव्हा तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात सोडियम जाते. तेव्हा ते द्रव पदार्थांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे रक्तदाब वेगाने वाढू शकतो. त्यामुळे सहसा जास्त मीठ खाणे टाळा.

लसूण आरोग्यासाठी फायदेशीर

जवळपास आपल्याकडे प्रत्येक भाजीमध्ये लसणाचा वापर केला जातो. लसूण हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही जर रोज सकाळी कच्च्या लसणाच्या पाकळ्या झाल्या तर यामुळे तुमच्या शरीराला खूप फायदा होतात. तुमचे कोलेस्ट्रॉल देखील कमी होते. आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.

गाजर आणि पालक रस

गाजर आणि पालकाचा रस देखील रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय बीट रूट आणि आवळा यांचा देखील तुम्ही समावेश करू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहील. तसेच शरीराला पोषक तत्वांचा देखील पुरवठा होईल.