उंच्चाकी कोरोनामुक्त : सातारा जिल्ह्यात 2 हजार 361 जणांना घरी सोडले, तर नवे 2 हजार 59 कोरोना पाॅझिटीव्ह

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 59 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात उंच्चाकी 2 हजार 361 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 22 हजार 694 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 11 हजार 937 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 86 हजार 620 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 2610 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोमुक्तीचा व बाधितांचा आकडा जवळपास समसमान असल्याचे दिसून येत आहे. रविवारी दिवसभरात 2 हजार 361 रूग्ण बरे होवून घरी गेले, जिल्ह्याला दिलासादायक बातमी आहे. तर रविवारी रात्री नव्याने केवळ 2 हजार 59 बांधितांच्यामुळे जिल्ह्यातील सर्वात रेकाॅर्डब्रेक आकडे थांबले नसल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. तर रविवारी दिवसभरात 36 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाल आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like