हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रमध्ये बलात्काराच्या तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. याबाबत अनेक गुन्हे देखील न्यायालयात दाखल झालेले आहेत. त्यानंतर उच्च न्यायालयाने दीर्घकाळापासून जर परस्पर सहमतीने आणि कोणत्याही फसवणुकीशिवाय नैतिक संबंध ठेवले, तर तो बलात्कार ठरत नाही. असे वक्तव्य केलेले आहे. त्यानंतर आता भारतीय दंड संहितेतील कलम 375 नुसार याचा निकाल देखील देण्यात आलेला आहे.
यावेळी न्यायमूर्ती अनिश कुमार गुप्ता यांनी असे म्हटले की, “लग्नाचे वचन हे परस्पर संमतीने शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठीचे वचन ठरत नाही. अशा नातेसंबंधांच्या सुरुवातीपासूनच आरोपींनी जर फसवे आश्वासन दिले असेल, तर ते खोटे वचन म्हणता येते. नातेसंबंधाच्या सुरुवातीच्या फसवंतीच्या काही घटक असेल, तर लग्नाचे खोटे आमिष म्हटले जाते. परंतु लग्नाचे खोटे वचन म्हणता येणार नाही.’
पुढे ते म्हणाले की, “या प्रकरणांमध्ये श्रेय गुप्ता नावाच्या व्यक्तीवर लग्नाचे वचन देऊन बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद झालेला आहे. न्यायमूर्तींनी हा खटला रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तिने श्रेयने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि शारीरिक संबंध ठेवले. अशी तक्रार दाखल केली आहे. तसेच तिने श्रेय यांच्यावर खंडणी मागितल्याची तक्रार देखील पोलिसात केली होती. या विरोधात श्रेयने देखील न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे या दोघांमध्ये 12 वर्षांपासून संबंध होते. या संबंधित महिलेचे वय जास्त आहे. तसेच श्रेय त्या महिलेच्या मृत झालेल्या पतीच्या कंपनीत कामाला होता. त्यामुळे महिलेने श्रेय याच्यावर दबाव टाकला असे देखील दिसून आलेले आहे. कलम 375 लागू होण्यासाठी महिलेने महिलेची संमती ही दबावाने, धमकावून किंवा गैरसमज निर्माण करून घेतलेली असावी असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. त्यामुळेच आता खूप काळापासून जर सहमतीचे अनैतिक संबंध असल्यास तो बलात्कार ठरत नाही. असे देखील उच्च न्यायालयाने घोषित केलेले आहे.