हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलत आहे. आणि याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांना वेगवेगळे आजार देखील होत आहेत. परंतु या सगळ्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली समस्या म्हणजे लठ्ठपणा. कामाचा ताण, बैठे जीवनशैली तसेच बाहेरचे खाणे या सगळ्या गोष्टींमुळे अनेक लोकांचे वजन वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न देखील करत आहेत. त्यांनी वेगवेगळे डाएट फॉलो करत आहेत. तसेच अनेक प्रकारचे पदार्थ देखील ते खात नाहीत. परंतु जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर तुम्हाला जास्त प्रोटीन असलेले पदार्थ खाणे खूप गरजेचे असते. त्यामुळेच तुम्ही तुमच्या वजनावर कंट्रोल ठेवू शकता.
तुम्ही जर हाय प्रोटीन असलेले पदार्थ खाल्ले तर तुमची पचनक्रिया देखील सुधारते. तुम्हाला कमी भूक लागते म्हणजेच तुमचे भूक वाढवणारे हार्मोन्स नियंत्रित राहतात. तसेच स्नायूंच्या वाढीसाठी देखील हे चांगले असते. यामुळे तुमची ऊर्जा पातळी वाढते. आता आपण जाणून घेऊया कोणत्या शाकाहारी पदार्थांमध्ये जास्त प्रोटीन असतात. जे तुम्ही खाऊ शकता आणि तुमचे वजन नियंत्रित ठेवू शकता.
अंडी
अंड्याचा पांढरा भाग हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. अंडी अनेक प्रकारे बनवता येतात, ते ऑम्लेट, तळलेले किंवा उकळून खाल्ले जाऊ शकतात.
मासे
सॅल्मन, ट्यूना आणि इतर मासे यांसारख्या माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड आणि प्रथिने भरपूर असतात. याच्या सेवनाने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
डाळी
मूग, हरभरा, मसूर यांसारख्या डाळींमध्ये फायबर आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे भूक कमी होते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
दही
ग्रीक दही हा प्रथिनांचा विशेषतः चांगला स्रोत मानला जातो. हे सॅलड, फ्रूट चाट इत्यादींसोबत खाऊ शकतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
क्विनोआ
क्विनोआ, प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो, तो ग्लूटेन-मुक्त आहे. याच्या सेवनाने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
काजू किंवा बिया
बदाम, अक्रोड किंवा चिया बिया यांसारखी सुकी फळे केवळ प्रथिनेच नव्हे तर निरोगी चरबीचेही चांगले स्रोत मानले जातात. याच्या सेवनाने शरीर निरोगी राहते. याशिवाय वजन कमी करण्यासही मदत होते.