विदर्भात सूर्य ओकतोय आग; पारा 43 अंशांवर

पुणे : एप्रिल महिन्यात उकाडा प्रचंड वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाने देशातील उच्चांक गाठला आहे. काल (2एप्रिल) ला चंद्रपुरात 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे चंद्रपूर सहित विदर्भातील अनेक ठिकाणी नागरिकांना उष्णतेच्या लाटा सहन कराव्या लागल्या आहेत. येथील किमान तापमानातही वाढ नोंदली गेली आहे त्यामुळे नागरिकांना रात्री देखील उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. एप्रिल महिन्यातच इतका उकाडा असताना मे महिन्यात काय होईल? अशी चिंता आता नागरिकांना सतावू लागली आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यात विदर्भाच्या तुलनेत तापमान थोडे कमी आहे. पण पुढील तीन दिवस पुण्यातील तापमान देखील वाढत जाण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यानंतर पुण्यातील तापमान पुन्हा कमी होऊन 37अंश सेल्सिअसवर स्थिरवेल. आज पुण्यातील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून उद्यापासून पुण्यात तापमान वाढणार आहे. पुण्यातील तापमान दोन अंशांनी वाढून 39 अंश सेल्सिअस पर्यंत पोहचेल त्यानंतर पुढील दोन दिवस पुण्यातील तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअस वर जाऊन पुन्हा यु टर्न घेईल.

दरम्यान महाराष्ट्रातील उर्वरित भागात देखील कडाक्याचं ऊन असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडणे टाळा. भरपूर पाणी प्या. उन्हाळ्याच्या दिवसात फिक्या रंगाची कपडे वापरा अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like