Friday, January 27, 2023

देशात मागील २४ तासांत 6 हजार 654 कोरोनाग्रस्त, 137 मृत्यू

- Advertisement -

नवी दिल्ली । देशातील कोरोना संकटाची परिस्थिती अजून चिंताजनकच आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येतील वाढ कमी होताना दिसत नाही आहे. देशभरात मागील २४ तासांत 6 हजार 654 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, 137 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 25 हजार 101 वर पोहचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशभरातील तब्बल 1 लाख 25 हजार 101 कोरोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या 69 हजार 597 जणांचा व आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 720 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यता आलेली आहे. तर, लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या महासाथीचा प्रादुर्भावाचा वेग कमी करण्यात मोठे यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन लागू केल्यामुळे १४ ते २९ लाख रुग्ण आणि ३७ ते ७८ हजार मृत्यू टाळण्यात यश आल्याचे केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचे सचिव प्रवीण श्रीवास्तव व कोरोनासंदर्भातील उच्चाधिकार गट-१चे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी सांगितले आहे. बॉस्टन कन्स्लटंट ग्रुपच्या अंदाजानुसार आत्ता देशात असलेल्या करोनाबाधितांपेक्षा रुग्णांची संख्या ३६ लाख ते ७० लाखांनी जास्त झाली असती. रुग्णांचे मृत्यूही १.२ लाखांनी वाढले असते.

कोरोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने शहरांमध्ये झालेला आहे. करोनाचे ८० टक्के रुग्ण आणि मृत्यू फक्त पाच राज्यांमध्ये आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळले आहेत. त्यातही करोनाचे ६० टक्के रुग्ण आणि मृत्यू फक्त मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद आणि ठाणे पाच शहरांमध्ये असल्याचेही सांगितले गेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”