Highway Services : खरं तर एखादा लांब पल्ल्याचा प्रवास करायचा झाला तर आपल्याला टोल भरावा लागतो. रस्ते बनवणारी कंपनी चांगल्या रस्त्यांच्या बदल्यात टोल वसुली करीत असते. पण तुम्हाला माहिती आहे का ? की टोला भरल्यानंतर हायवे वरून प्रवास करताना इतरही सुविधा तुम्हाला मिळू शकतात. एवढेच नाही तर इमर्जन्सीच्या वेळेला मदत करणे हे हायवे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे कर्तव्य आहे. चला जाणून घेऊया यामध्ये नक्की कोणत्या सुविधांचा (Highway Services) समावेश आहे.
सर्व टोल नाक्यांवर अँब्युलन्स, रिकव्हरी व्हेइकल आणि सिक्युरिटी टीम्स तैनात ठेवल्या जातात. रस्त्यात कुठल्याही वाहनचालकाला एखाद्या इमर्जन्सीला सामोरं जावं लागलं असता एका (Highway Services) फोनवर ही वाहनं पाठवली जातात. त्यासाठी एनएचएआयकडून काही हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
गाडीतील इंधन संपल्यास
टोल लागू असलेल्या हायवेवरून प्रवास करताना तुमच्या गाडीतलं (Highway Services) पेट्रोल संपलं आणि आसपास पेट्रोल पंप नसेल तर गाडी बाजूला घेऊन तुम्ही टोल रिसीटवर देण्यात आलेल्या हेल्पलाइन नंबरला किंवा 8577051000 या नंबरला फोन करा. पण पेट्रोल किंवा डिझेलची किंमत तुम्हाला द्यावी लागते; पण त्याव्यतिरिक्त कुठलाही एक्स्ट्रा चार्ज तुमच्याकडून आकारला (Highway Services) जात नाही.
गाडी बंद पडल्यास
टोल हायवेवरून प्रवास करताना गाडी बंद पडली तर मेकॅनिक किंवा फ्री क्रेन सर्विस मिळू शकते. 8577051000, 7237999955 या नंबरवर फोन करून तुम्ही अशी मदत मिळवू शकता.
मेडिकल इमर्जन्सी (Highway Services)
टोल हायवे वरून प्रवास करताना कोणी आजारी पडलं तर वैद्यकीय मदत मिळणं हा तुमचा हक्क आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अँब्युलन्स तुम्ही बोलवू शकता. 8577051000 किंवा 7237999911 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही मोफत अँब्युलन्स मिळवू शकता.
इतर अडचणी आल्यास
टोल हायवेवरुन प्रवास करताना याशिवाय इतर कोणतीही अडचण आली तर 1033 किंवा 108 वर फोन करून तुम्ही मदतीची मागणी करू शकता. ही सेवा 24 तास सुरू असते. तुमचा फोन (Highway Services) थेट एनएचएआयच्या प्रतिनिधीशी जोडला जातो आणि तातडीने तुमच्यापर्यंत मदत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते.