Hina Khan : हिना खानला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर!! उपचार सुरु; कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hina Khan) हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय चेहरा अभिनेत्री हिना खानच्या प्रकृती संदर्भात अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. कायम ग्लॅमरसाठी चर्चेत असणारी हिना कॅन्सरसारख्या गंभीर आजराशी दोन हात करतेय आणि यावरील उपचारांसाठी ती रुग्णालयात दाखल झाल्याचे समजत आहे. याबाबत तिने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्री हिना खानने आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे सांगितले आहे. पाहूया तिने या पोस्टमध्ये काय म्हटलंय?

हिना खानची पोस्ट (Hina Khan)

अभिनेत्री हिना खानने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, मला एक महत्त्वाची बातमी शेअर करायची आहे. माझी ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजशी झुंज सुरु असून उपचार सुरु आहेत. या आजारावर मात करण्यासाठी मी खूप मजबूत आहे. सध्या उपचार सुरू झाले असून मी या आजारातून बरी होण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलण्यास सज्ज आहे. या कठीण काळात मी तुम्हा सर्वांकडे गोपनीयतेची विनंती करते’.

पुढे लिहलंय, ‘मला विश्वास आहे की, मी लवकरच पूर्णपणे बरी होईल. माझ्या चाहत्यांच्या प्रेमासाठी मी कायम त्यांची ऋणी आहे. या काळात त्यांनी मला त्यांच्या प्रार्थनेत लक्षात ठेवावे आणि मला खूप आशीर्वाद पाठवावे बस इतकीच विनंती आहे’. हिना खानच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांची तिच्या तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना केल्या आहेत. (Hina Khan) दरम्यान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत असताना हिना शारीरिकरित्या कमजोर होत असली तरीही मानसिकरित्या ती सक्षम आहे. त्यामुळे या आजारातून ती लवकरच बरी होईल आणि परतेल अशी आशा आहे.

ब्रेस्ट कॅन्सरविषयी अधिक जाणून घ्या

स्तनांमध्ये कॅन्सरची गाठ तयार झाल्यास त्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे म्हटले जाते. ही गाठ ज्या ठिकाणी आहे तिथे वेदना होत नसेल तर ब्रेस्ट कॅन्सर असण्याची शक्यता असते. वयाच्या २०व्या वर्षापासून दर महिन्याला स्वतःची तपासणी करणे गरजेचे आहे. कारण, ब्रेस्ट कॅन्सर जितक्या लवकर समजतो तितक्या लवकर यावर उपचार करून बरे होता येते. अगदी पहिल्या टप्प्यातच समजून आल्यास रुग्ण १००% बरा होऊ शकतो. (Hina Khan) शिवाय आवश्यक ती सर्जरी लवकर झाली तर स्तन काढावे लागत नाही. लहान गाठ काढून टाकली जाते. स्तनाग्रातून कोणत्याही प्रकारचे रक्तरंजित स्त्राव होणे, स्तनाचा आकार बदलणे, स्तन एकमेकांपासून वेगवेगळ्या दिशेने फिरू लागणे, स्तनाग्र आतल्या बाजूने बुडू लागणे, त्वचा ताणून लाल होणे ही या रोगाची महत्वाची लक्षणे आहेत.