हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंडेनबर्गच्या नव्या अहवालामुळे (Hindenburg Report On Adani) शेअर मार्केट मध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली असून अदानी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानींच्या शेअर्स कंपन्यांमध्ये सेबी अध्यक्षाचा सहभाग आहे , त्यामुळे ज्या पद्धतीने तपास होणे आवश्यक होते, तसा होऊ शकला नाही असा आरोप करून हिंडेनबर्गने खळबळ उडवली. या आरोपानंतर अदानी ग्रुपचे जवळपास सर्वच शेअर्स खाली आलेत. अदानी विल्मार, अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस , अदानी एनर्जी सोल्युशन्स. अदानी ग्रीन एनर्जी सारखे शेअर्स एकदम घसरल्याने गुंतवणूकदारांची तारांबळ उडाली आहे.
कोणता शेअर्स किती टक्क्यांनी घसरला –
अदानी समूहाचा अदानी एनर्जी सोल्युशन्स ४. ५० टक्क्यांनी घसरला, अदानी एंटरप्रायझेस देखील 3.17 टक्क्यांनी घसरला, . अदानी टोटल गॅस 7 टक्क्यांपेक्षा जास्तीने कमी झाला आहे. अदानी विल्मारमध्ये 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाली, फॉर्मात असलेला अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर्स सुद्धा 3.61% घसरला. अदानी यांच्या मालकीच्या अंबुजा सिमेंटमध्ये 1.54 टक्के घसरण झाली आहे. अदानी पॉवरच्या शेअर्स मध्येही तब्बल 9 टक्क्यांहून अधिक घसरल्याचे पाहायला मिळालं. परिणामी, गुंतवणूकदारांचे सुमारे 53,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून अदानी समूहाच्या 10 कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप 16.7 लाख कोटी रुपयांवर घसरले. अदानी समूहासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
अदानी टोटल गॅसता शेअर 4.93 टक्क्यांनी घसरून 826.60 वर आला आहे. अदानी विल्मारचे शेअर्स 2.82 टक्क्यांनी घसरून 374 रुपयांवर आहेत. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 3.18 टक्क्यांनी घसरून 1723.45 वर आलाय. अदानी पॉवरचे शेअर्स 3.14 टक्क्यांनी घसरून 673.25 रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी पोर्ट अँड एसईझेडचे शेअर्स 2.17 टक्क्यांनी घसरून 1500 रुपयांवर व्यवहार करत आहेत. अदानी ग्रुपचा सर्वात मोठा शेअर्स असलेल्या अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरून 3060 रुपयांवर पोचले आहेत. (Hindenburg Report On Adani)
हिंडनबर्गचा आरोप काय होता?– Hindenburg Report On Adani
सेबीच्या प्रमुख व त्यांच्या पतीचे अदानी समूहाशी मिलिभगत आहे. या दोघांचीही अदानीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. त्यामुळंच आरोप होऊनही अदानी समूहावर कुठलीही कारवाई केली जात नाही, असा आरोप हिंडेनबर्गनं केला आहे. आपण आपले कामकाज सुरू ठेवल्यास, त्यामध्ये कोणताही गंभीर हस्तक्षेप होण्याची जोखीम नाही याचा अदाणींना वाटणारा संपूर्ण आत्मविश्वास आमच्या आधी लक्षात आला होता. त्यामुळे अदाणींचे माधवी बुच यांच्याशी असलेल्या संबंधांमधून त्याचा खुलासा मिळेल असे सूचित होत होते. तेव्हा आम्हाला माहित नव्हते की, माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचे त्याच बर्म्युडा आणि मॉरिशस फंडांमध्ये छुपे हिस्सेदारी होती, ज्यांचा वापर विनोद अदाणींनी (आर्थिक गैरव्यवहारांसाठी) केला होता. आम्ही अदाणींच्या भांडवली बाजारातील घोटाळ्याबद्दल १८ महिन्यांपूर्वी अहवाल प्रसिद्ध केला होता. त्याचा तपास करण्यात ‘सेबी’ने आश्चर्यकारकरित्या उत्साहाचा अभाव दाखवला होता’’ असे हिंडनबर्गने म्हटले. मात्र माधवी बूच यांनी हिंडेनबर्गचे हे सत्व आरोप फेटाळले आहेत.