सुपने आरोग्य केंद्रातील सेविकांसह परिचारिकांचा हिदू एकताच्यावतीने सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील सुपने येथे कोरोनाच्या कालावधीत परिचारिकांकडून केली जाणारी रुग्णसेवा कौतुकास्पद आहे. त्यांच्या याच सेवेचा सन्मान करण्याच्या हेतूने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेविकांसह गावातील सर्वच परिचारिकांचा हिंदू एकताच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी हिंदू एकताचे पाटण तालुकाध्यक्ष तुषार ऊर्फ गणेश पाटील, डॉ. सुनीता खरात, रमेश पाटील, परिचारिका भाग्यश्री सूर्यवंशी, शोभा यादव, अपर्णा कोळी, सुवर्णा गजर, नीलम दीपक पाटील, सुप्रिया अविनाश जाधव, उज्ज्वला विशाल सूर्यवंशी, अजित जाधव, विकी कांबळे, अविनाश जाधव, दीपक पाटील, विशाल सूर्यवंशी उपस्थित होते.

जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी परिचारिकांचा सत्कार करून त्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक परिचारिकेच्या काळ देखभालीखाली असतो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका अहोरात्र सेवा करत असतात. सध्याच्या कोरोनोसारख्या महाभयंकर संकटात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊच शकत नाही, असे मत यावेळी गणेश पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Comment