हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदू धर्मात विवाहाला मोठं महत्व आहे. हिंदू धर्मात अनेक धार्मिक रितीरिवाजानुसार आणि अगदी थाटामाटात लग्नसोहळा पार पाडला जातो. यामध्ये मुलीच्या पालकांकडून तिचे कन्यादान केलं जाते तसेच लग्नसोहळा पार पडल्यानंतर अग्नीसमोर सप्तपदी विधी केला जातो. मात्र हिंदू विवाहामध्ये (Hindu Marriage Act) कन्यादान आवश्यक नसून सप्तपदी हाच महत्त्वाचा विधी आहे असे निरीक्षन अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने आशुतोष यादव याने दाखल केलेल्या पुनरीक्षण याचिकेवर सुनावणी करताना याबाबत निर्णय दिला आहे
हिंदू धर्मातील कायद्यात ‘सप्तपदी’ हा अत्यावश्यक समारंभ – Hindu Marriage Act
याबाबत अधिक माहिती अशी कि, आशुतोष यादव यांनी सासरच्यांनी दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात 6 मार्च रोजी लखनौच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशाला आव्हान दिले होते.. त्यांनी ट्रायल कोर्टासमोर असे सांगितले होते की हिंदू धर्मातील कायद्यानुसार त्याच्या लग्नासाठी ‘कन्यादान’ समारंभ गरजेचा आहे, जो त्यांनी केला नव्हता, मात्र यावर उत्तर देताना न्यायालयाने म्हंटल कि, ” हिंदू धर्मातील कायद्यात ‘सप्तपदी’ हा अत्यावश्यक समारंभ आहे.. हिंदू विवाह सोहळ्यासाठी कन्यादान विधी आवश्यक असल्याने तरतूद हिंदू विवाह कायदा करत नाही. त्यामुळे ‘कन्यादान’ सोहळा पार पडला की नाही, या प्रकरणात न्याय्य निर्णयासाठी आवश्यक नाही,’ असे म्हणत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी आशुतोष यादव यांची याचिका रद्द केली.
या खटल्यात दोन साक्षीदारांना बोलावण्यासाठी दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली. याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या विवाह प्रमाणपत्रात हिंदू रीतिरिवाजानुसार (Hindu Marriage Act) विवाह सोहळा पार पडला होता, परंतु कन्यादान” सोहळ्याची वस्तुस्थिती तपासणे आवश्यक होते. “कन्यादान समारंभ पार पडला की नाही, या खटल्याच्या न्याय्य निर्णयासाठी आवश्यक नाही,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे कलम ३११ सीआरपीसी अंतर्गत साक्षीदाराला बोलावले जाऊ शकत नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने फौजदारी पुनर्विचार याचिका फेटाळली.