परीक्षा न देताच हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये थेट भरती सुरु; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली असून या भरती अंतर्गत ग्रॅज्युएट आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदाच्या एकूण 116 जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट मुलाखती द्वारे भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – हिंदुस्थान पेट्रोलियम

पद संख्या – 116 पदे

भरली जाणारी पदे –

पदवीधर शिकाऊ उमेदवार – 86 पदे
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार – 30 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (HPCL Recruitment 2023)

पदवीधर शिकाऊ उमेदवार –

उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक.

तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार –

उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा असणे आवश्यक.

निवड प्रक्रिया – मुलाखत

वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे

(आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे.)

मिळणारे वेतन –

पदवीधर शिकाऊ उमेदवार – Rs. 25,000/- दरमहा
तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार – Rs. 15,000/- दरमहा (HPCL Recruitment 2023)

आवश्यक कागदपत्रे –

Resume
दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/