विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊचा हात?? त्या व्हिडिओ नंतर विद्यार्थी रस्त्यावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्या म्हणून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या आंदोलयामागे हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठक यांचा हात असल्याची शक्यता समोर येत आहे. हिंदुस्थानी भाऊचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जातंय.

सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन बैठक घेत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? असा सवाल हिंदुस्थानी भाऊनं त्याच्या व्हिडिओमधून केला. सरकारने विद्यार्थ्यांसोबत खेळू नये. त्यांच्या करिअरसोबत खेळू नका. तेव्हा मी एकटा रस्त्यावर उतरलो होतो आता लाखो विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरणार, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आज विद्यार्थ्यांनी आज ठिकठिकाणी आंदोलन केले.

दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. ज्या ज्या लोकांची नावे याप्रकरणात समोर येतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे हिंदुस्थानी भाऊ च्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे