हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकावल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊ ला एक फ्रेब्रुवारी रोजी धारावी पोलिसांनी अटक केली होती. अखेर आज त्यांना जामीन मंजूर झाला असून एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला 30 हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे, गेल्या 17 दिवसांपासून तुरुंगात असलेला हिंदुस्थानी भाऊ आता जेलमधून बाहेर येईल.
हिंदुस्थानी भाऊ ला का अटक झाली?
राज्यात 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप हिंदुस्थानी भाऊ वर करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली होती.