‘बिग बॉस’ फेम हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांचा पाहुणचार; ट्विटर पोस्ट करून केले आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखाद्या मुद्द्यांवर वादग्रस्त विधाने करून सोशल मीडियावर फेमस होणे हा एक ट्रेंड आहे. या ट्रेण्डमधील मास्टर म्हणजे असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट करीत प्रकाश झोतात आलेला विकास पाठक. अर्थातच तुमच्या ओळखीत असणारा हिंदुस्थानी भाऊ याला काल पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिली. याचे कारण असे कि १२ वीच्या परीक्षा रद्द करा अशी मागणी करीत त्याने शिवाजी पार्क येथे एकदम जोरो शोरेसे आंदोलन केले. मग काय? हे आंदोलन त्याच्याच अंगाशी आले. या आंदोलनापायी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. इतकेच नव्हे तर याची खासियत म्हणजे याबाबत त्याने आधीच ट्विटरवर कळविलेले होते.

https://www.instagram.com/p/COmvcchD_-G/?utm_source=ig_web_copy_link

विकास पाठक म्हणजेच हिंदुस्थानी भाऊ मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे आंदोलन करत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इयत्ता १२वीच्या मुलांची परीक्षा रद्द करण्यात यावी, या संदर्भात हिंदुस्थानी भाऊने हे आंदोलन छेडले होते. याशिवाय सरकारने मुलांची शालेय फीदेखील माफ करावी, अशी मागणी हिंदुस्थानी भाऊ आंदोलनात करत होता”. याबाबतची सविस्तर माहिती सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने इंस्टाग्रामवर दिली आहे. हिंदुस्थानी भाऊचा हा राडा व्हिडीओ विरल भयानी यानेच इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या आंदोलनाबाबत एक खास बातमी अशी कि हे आंदोलन मनात आले आणि उठून केले अश्या अविर्भावाचे नाहीच मुळी. या आंदोलनाची सविस्तर माहिती हिंदुस्थानी भाऊने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ६ मे २०२१ रोजीच दिली होती.

हिंदुस्थानी भाऊ सोशल मीडियाच्या जगतात आपल्या व्हिडिओंसाठी खूप प्रसिद्ध आहे. रोखठोक, बिनधास्त आणि बेधडक भूमिकेसाठी हिंदुस्थानी भाऊची तरुणाईमध्ये खूप क्रेझ आहे. यावरुनच त्याची बिग बॉससाठी निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमातही ‘हिंदुस्थानी भाऊ’ने त्याच्या हटके अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या शो नंतर हिंदुस्थानी भाऊंची क्रेझ आधीहून अधिकच वाढली. इतकेच नव्हे तर त्याच्या फॅन फॉलोईंग मध्ये सुद्धा जबरदस्त वाढ झाली आहे. देशाविरोधात भाष्य कऱणाऱ्यांची ‘हिंदुस्तानी भाऊ’ त्याच्या अनोख्या ढंगात आणि हटके बोलीत फिरकी घेतो. भाऊचे टिकटॉकवर जवळजवळ ६ लाख फॉलोअर्स होते. तर यूट्युबवर तब्बल १० लाखांपेक्षा अधिक सबस्क्राइबर्स आहेत.

Leave a Comment