हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के

हिंगोली प्रतिनिधी : हिंगोली वसमत तालुक्यात जिल्हाभरात आज सकाळी अंदाजे 8-30 ते 8-36 या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळ सकाळी भुकंपाचे धक्के जाणवल्याने काही वेळासाठी नागरिकांत संभ्रमाचे वातावरण पसरले होते.

आज गुंज, पांगरा शिंदे, शिवपुरी, टाकळगाव, इंजनगाव, गिरगाव, कुरूंदा , इंजनगाव , म्हातारगाव, महागाव ,डोणवाडा ,सुकळी, सेलू , अंबा, कौठा, खुदनापुर , किन्होळा सह वसमत शहरात हे धक्के जाणवले आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनामार्फत या भूकंपाची माहिती घेण्याचे काम सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी केले आहे. डोणवाडा, सुकळी, सेलू सह इतर गावात भुकंपाचे धक्के जाणवल्याची नागरिकांची माहिती आहे.

 

You might also like