हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Hinjewadi IT Park । पुण्यातील IT पार्क असलेल्या हिंजवडीतील सर्व समस्या जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकासकाळीच पाहणी दौरा केला. या दौऱ्यावेळी त्यांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेतला तसेच हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. यावेळी त्यांनी हिंजवडीच्या सरपंचाना खडेबोल सुनावताना एक मोठं वक्तव्य केलं. आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं IT पार्क बंगळुरू, हैद्राबादला चाललंय असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?- Hinjewadi IT Park
हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर याना अजित पवार याना काहीतरी सांगत होते, त्यावर उत्तर देताना अजितदादा म्हणाले, अहो असू द्या हो असू द्या हो साहेब, धरण करताना मंदिर जातात की नाही. तुम्हाला सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो… आपलं वाटोळं झालंय, आपलं हिंजवडीचं सगळं आयटी पार्क (Hinjewadi IT Park) बाहेर चाललंय …माझ्या पुण्यातून आणि महाराष्ट्रातून बाहेर….बेंगलोरला हैदराबादला चाललंय …काय तुम्हाला पडलं नाही….कशाला मी सहा वाजता पाहणी करायला येतो इथं, यांच्यामुळेच बघतोय ना …. मला कळत नाही माझी माणसं नाहीत… परंतु हे केल्याशिवाय गत्यंतर नाही… असं म्हणत अजित पवार यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर खडेबोल सुनावले.
दरम्यान, कामाच्यामध्ये कोणी आला तर त्यावर 353 दाखल करा.तो कोणीही असेल तरी करा. अजित पवार जरी मध्ये आले, तरी 353 टाका 353 लावल्याशिवाय हे काम होणार नाही. नाहीतर प्रत्येक जण माझं हे करा आणि माझं ते करा सुरु राहिलं. ते आपल्याला होऊ द्यायच नाही. एकदाच संपूर्ण कामच करुन टाकायचय अशा सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अजित पवार हे त्यांच्या वक्तशीरपणासाठी आणि पहाटे उठून काम करण्यासाठी ओळखले जातात. दादांचा दौरा म्हणजे अधिकाऱ्यांची भंबेरी उडतेच. आजही सकासकाळी याचा प्रत्यय बघायला मिळाला.




