ऐतिहासिक! शहरात एकाच दिवशी 101 इलेक्ट्रिक कार दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – नोंदणी केलेल्या 250 पैकी सोमवारी एकाच दिवशी 101 इलेक्ट्रिक कार शहरात दाखल झाल्या. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्री या कारचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, यामध्ये 25 महिला डॉक्टर्स, उद्योजक, प्राध्यापकांचा समावेश आहे. शहराला ईव्ही मॅपवर नेण्याच्या दिशेने पडलेले हे पाऊल म्हणावे लागेल.

दोन महिन्यांपूर्वी मराठवाडा ऑटो क्लस्टरने औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी (एएमजीएम) या अभियानाची सुरुवात केली होती. या अभियानांतर्गत शहरातील उद्योजक, वकील, डॉक्टर, प्राध्यापक व काही नागरिकांनी 250 इलेक्ट्रिक कारची बुकिंग केली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात सोमवारी 101 कारचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. औरंगाबाद शहर हे राज्यातील आघाडीचे औद्योगिक उत्पादन आणि ऑटोमोबाईल हब म्हणून नावारूपास आलेले आहे.

कार्यक्रमास मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता उपस्थित होते. मनपा प्रशासक पाण्डेय म्हणाले, स्मार्टसिटीवतीने ईव्ही पॉलिसीची अंमलबजावणी करण्यात येत असून लवकर शहरबसमध्ये नवीन 60 ईव्ही बस दाखल होतील. कर्मचाऱ्यांसाठी ईव्ही कार आणि शहरात 200 हून अधिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

Leave a Comment