पांडवगडावर सापडले ऐतिहासिक शिवलिंग; बघण्यासाठी भक्तांची झुंबड

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाशिवरात्रीच्या पर्वावरच भिवंडी तालुक्यातील वाहुली गावा जवळील पांडवगडावर एक ऐतिहासिक घटना घडली आहे. पांडवकुंडाच्या स्वच्छतेच्या कामा दरम्यान पुरातन शिवलिंग आणि पादुका सापडली आहे . या शोधामुळे परिसरातील शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे पुरातन शिवलिंग बघण्यासाठी गर्दी वाढत निघाली आहे.

शिवलिंगाला ‘पांडूकेश्वर’ म्हणून ओळखले जाणार –

शिवरूपानंद स्वामी आणि माधव महाराज भोईर यांच्या उपस्थितीत या शिवलिंगाला ‘पांडूकेश्वर’ म्हणून ओळखले जावे, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी भगवान शिवाचे गजर करत शिवनामाचा जयघोषही करण्यात आला. शिवलिंग सापडल्याची बातमी परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि परिसरातील अनेक भक्त पांडवगडावर धाव घेतली. या ऐतिहासिक शोधामुळे यंदाच्या महाशिवरात्रीला पांडवगडावर 111 महारुद्र जलाभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवलिंगाच्या शोधामुळे यंदा भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज बांधला जात आहे.

भविष्यकाळात तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध –

स्थानीय लोकांच्या मते, ‘पांडूकेश्वर’ हे ठिकाण भविष्यकाळात तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होईल. या ऐतिहासिक शोधामुळे पांडवगडाचे अध्यात्मिक महत्त्व वाढले असून, पर्यटनासाठी , भक्तांसाठी नवे श्रद्धा स्थान निर्माण होईल. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून, महाशिवरात्रीच्या सणाला एक नवा ऐतिहासिक मार्ग निर्माण झाला आहे.