विशेष प्रतिनिधी । अहमदनगर हे महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे . अहमदनगरचे नाव अहमद निजाम शाह प्रथम यांचे आहे, ज्याने १४९४ मध्ये या शहराची स्थापना बहामनी सैन्याविरूद्ध लढाई जिंकली अशा रणांगणाच्या जागेवर केली. बहमनी सल्तनत फुटल्यानंतर अहमदने अहमदनगरमध्ये नवीन सल्तनत स्थापन केली, ज्याला निजाम शाही राजवंश म्हणून ओळखले जाते.
भुईकोट किल्ला
अहमदनगरमध्ये निझाम शाही काळातील अनेक इमारती आणि साइट आहेत. एकेकाळी जवळजवळ अभेद्य मानला जाणारा अहमदनगर किल्ला, भारतीय स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी जवाहरलाल नेहरू आणि इतर भारतीय नेत्यासाठी कारागृह म्हणून वापरला होता. तेथील काही खोल्या संग्रहालयात रूपांतरित करण्यात आल्या आहेत. १९४४ मध्ये अहमदनगर किल्ल्यावर कैदेत असताना नेहरूंनी ‘दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले.
भुईकोट किल्ला प्रवेशद्वार
अहमदनगरमध्ये इंडियन आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (एसीसी अँड एस), मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी), वाहन संशोधन व विकास आस्थापना (व्हीआरडीई) आणि गुणवत्ता नियंत्रण व्हीकल्सचे नियंत्रक (सीक्यूएव्ही) देखील आहेत. भारतीय सैन्य आर्म्ड कोर्प्सचे प्रशिक्षण आणि भरती केंद्र देखील येथे आहे.
हत्ती बारव
मराठा साम्राज्याच्या विरोधात मोहीम काढणारा औरंगजेब शेवटी परत जाण्याकरिता निघाला तेव्हा १७०६ ते १७०७ या दरम्यान अहमदनगरमध्येच राहिला होत . त्यामुळे त्याच्या कैदेत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पत्नी सकवारबाई, शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई, मुलगा शाहूसह अनेक मराठ्यांनी अहमदनगरचा पाहुणचार घेतलेला आहे. एवढेच नाही तर सतत २६ वर्षे दक्षिणेच्या मोहिमेवर असणारा औरंगजेब वार्धक्यामुळे २० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगरमध्येच मरण पावला .
सलाबतखान मकबरा (चांदबीबी महाल)
पुढे १७५९ साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो महादजी शिंदेच्या जहागिरीत होता. मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणिसांना नगरच्याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. पुढे १८१७ रोजी तो ब्रिटिशांनी जिंकल्याने त्यांनी अहमदनगरला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांमुळे शहराच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली तर १९४२ ला स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेसने आंदोलन उभे केले तेव्हा अनेक राजकीय कैदी नगरच्या किल्ल्यात डांबण्यात आले. पैकी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम दोन वर्षे होता. यादरम्यान त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. याच ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉट ऑफ पाकिस्तान’ व मौलाना आझादांनी ‘गुबारेखातीर’ लिहून काढला.
भुईकोट किल्ल्यातील झुलता पूल
अहमदनगर शहर हे एकेकाळी आदर्श शहर होते . परंतु आज कमकुवत राजकीय इच्छाशक्तीमुळे शहर इतिहासातच जगते आहे . शहराचा विकास नसल्याने या शहरवषयी अनेकांना माहिती कमी आहे . पावसाचे प्रमाण कमी असल्याने हा जिल्हा दुष्काळातच राहतो . समस्या आणि संकटांकडे राजकीय व्यक्तिमत्व निर्णयांती जात नाहीत . परिणामी सोयी सुविधा या कागदावरच राहतात . परंतु जर पर्यटन विकास झाला तर महाराष्ट्र्राच्या इतिहासातील प्रत्येक घटनेचे एक पान हे अहमदनगरवरच उघडेल .
मांजरसुंबा प्रवेशद्वारातून दिसणारा गोरक्षनाथ गड
सलाबतखान मकबरा किंवा स्थानिक यास चांदबीबी मकबरा म्हणून ओळखतात . काही दिवसांपूर्वी या वास्तूची काही प्रमाणात स्वच्छता करण्या आली . परंतु हत्ती बारव , दमडी मशीद , फरहाबाद मकबरा (ताजमहालाची मूळ संकल्पना इथूनच मिळाली आहे .) भुईकोट किल्ला , भिस्तबाग या ऐतिहासिक वस्तूंची डागडुजी आणि स्वच्छता हा अनेक वर्षांपासून दुर्लक्षित विषय आहे . या वास्तूंविषयी सविस्तर माहिती घेउयातच…
मांजरसुंबा गड