व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कारला धडकताच ऑन द स्पॉट गेला बाईकस्वाराचा जीव, व्हिडिओ आला समोर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पावसाळ्यामध्ये अपघाताच्या (accident) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या अशाच एका अपघाताचा (accident) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा अपघात (accident) इतका भयंकर आहे की एका धडकेत जागच्या जागी चालकाचा जीव गेला आहे. हि संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.

काय घडले नेमके ?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, मुसळधार पाऊस कोसळतो आहे. एका रस्त्यावरून एक कार हळूहळू येताना दिसत आहे. एवढ्यात दुसऱ्या बाजूने एक बाईक भरधाव वेगाने येते. कार त्यावेळी रस्त्याच्या अगदी मधोमध असते त्यामुळे बाईक या कारला धडकते(accident). एका धडकेतच बाईक एका बाजूला पडते आणि बाईकवर बसलेले दोघं जण हवेत उडतात. त्यापैकी बाईक चालवणारा कारच्या टपावर पडतो आणि हळूहळू सरकत खाली येतो आणि धाडकन जमिनीवर कोसळतो. तर एक थोड्या अंतरावर पुढे जमिनीवर पडतो.

हा अपघात (accident) घडला तेव्हा त्या ठिकाणी काही लोक उपस्थित होते. हा अपघात पाहून तेसुद्धा हैराण झाले. कारचालक तिथून निघून गेला. त्यानंतर हे लोक धावत त्या बाईकस्वाराजवळ आले. थेट जमिनीवर पडलेल्या व्यक्तीमध्ये हालचाल दिसत आहे. पण जी व्यक्ती कारवरून जमिनीवर कोसळली ती काहीच रिस्पॉन्स देत नाही. त्याला पाहून त्याचा जागीच जीव गेला आहे असे दिसत आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर