हिटमॅन रोहित पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये ; पहा रोहितची तुफान फटकेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अखेर १९ सप्टेंबरपासून यूएई मध्ये आयपीएल स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आले. २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखलही झाले. तेथील क्वारंटाइन कालावधी संपवून खेळाडूंची सराव सत्रही सुरू झाली. त्यातच मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज रोहित शर्माची तुफान फटकेबाजी दिसून आली.

युएईमध्ये दाखल झाल्यानंतर रोहितने वर्कआऊटला सुरूवात केली होती. आता मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये रोहित गोलंदाजांचा समाचार घेताना दिसत आहे.नेट्समध्ये रोहितने केलेल्या तुफान फटकेबाजीचा व्हिडीओ चाहत्यांच्या खूप आवडला आहे.

रोहित शर्मा मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याने मुंबईला तब्बल वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली आहे.एक फलंदाज आणि कर्णधार अशा दुहेरी भूमिकेत सांभाळत रोहितने मुंबईला चॅम्पियन बनवलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like