Sunday, May 28, 2023

‘IFSC केंद्राबाबतचा तुमचा वकिली बाणा गेला खड्यात’; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ

मुंबई । मोदी सरकानं मुंबईत प्रस्तावित असलेलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या निर्णयाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. या निर्णयावरून राज्यातील राजकारणही बरंच तापलं आहे. एकीकडे भाजपा IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या निर्णयाला काँग्रेसचं जबाबदार असल्याचं सांगत केंद्राचा बचाव करण्याचा प्रयन्त करत आहे. तर राज्यातील इतर नेते केंद्रानं मुंबईवर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली आहे. अशात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे. यावेळी राऊत यांनी IFSC केंद्रावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे न घेता त्यांच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला.

‘तुमचा वकिली बाणा गेला खड्यात, महाराष्ट्रावर जर अन्याय होतोयतर त्यांनी आवाज उठवला पाहिजे. जर IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या निर्णय महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहे, असं कोणाला वाटत नसेल, तर तुम्ही या महाराष्ट्राचं राजकारण करण्यास नालायक आहात,  अशी तोफ संजय राऊत यांनी एका मुलाखतीत डागली आहे.

”राज्याच्या इतिहासात मला प्रथमच असा विरोधी पक्ष दिसतोय, जो कुठल्याही प्रश्नावर महाराष्ट्राची बाजूच घेत नाही. तो महाराष्ट्राच्या विरोधात घडणाऱ्या घटनांची आणि त्यांच्या नेत्यांची बाजू घेत आहे. नरेंद्र मोदी आमचेही नेते आहेत. देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. आमचं त्यांच्याशी वैयक्तिक भांडण असूच शकत नाही. पण, हा महाराष्ट्राच्या हक्काचा प्रश्न आहे. अधिकाराचा, अस्मितेचा प्रश्न आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष, त्यांचे नेते पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. यासाठी त्यांचा आत्मा तळमळला पाहिजे. तुमचा वकिली बाणा गेला खड्यात, त्यांनी महाराष्ट्रावर हा अन्याय होतोय म्हणून आवाज तरी उठवला पाहिजे. जर हा महाराष्ट्रावर अन्याय आहे, असं कोणाला वाटत नसेल, तर तुम्ही या महाराष्ट्राचं राजकारण करण्यास नालायक आहात,” अशा तिखट शब्दात राऊत यांनी फडणवीस यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”