हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात HMPV (HMPV Symptoms) व्हायरस वाढत आहे. चीनमध्ये हा व्हायरस झपाट्याने पसरत असून आता भारतातही या व्हायरसने प्रवेश केला आहे. देशात आतापर्यंत या व्हायरसचे 9 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी चिंता व्यक्त केली जात आहे. काही लोक हा व्हायरस कोरोनाइतकाच धोकादायक असल्याचे मानत आहेत, मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO – World Health Organization) हे स्पष्ट केले आहे की हा व्हायरस नवा नाही आणि घाबरण्याची गरज नाही. WHO च्या मते, HMPV हा साथीचा रोग बनणार नाही, पण या व्हायरसपासून बचावासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. योग्य उपचार आणि वेळेवर लक्षणांची ओळख होणे महत्त्वाचे आहे. तर चला जाणून घेऊया HMPV व्हायरसची प्रमुख लक्षणे.
HMPV ची विविध लक्षणे – HMPV Symptoms
HMPV व्हायरसच्या संसर्गामुळे शरीरामध्ये विविध लक्षणे दिसतात . (HMPV Symptoms)
यामध्ये खोकला, मांसपेशींच्या वेदना, डोकेदुखी, थकवा, श्वास घेण्यात त्रास, गळा खराब होणे, ताप , आणि नाक बंद होणे यासारखी लक्षणे समाविष्ट आहेत.
या व्हायरसामुळे श्वसन मार्गातील सूज वाढते, ज्यामुळे खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
शरीराची प्रतिकारशक्ती व्हायरसशी लढताना मांसपेशींच्या वेदना आणि थकवा निर्माण होऊ शकतो.
त्याचप्रमाणे, डोकेदुखी आणि ताप देखील सामान्य लक्षणे आहेत.
सर्दी आणि नाक वाहणे ही देखील शरीराची प्रतिकारशक्ती व्हायरसला बाहेर टाकण्याचा एक प्रयत्न आहे.
HMPV चे लक्षणे शरीरात विविध पद्धतीने प्रकट होतात, ज्यामुळे संसर्गाची गती आणि तीव्रता माणसांमध्ये वेगळी असू शकते.
HMPV साठी उपाय –
एचएमपीव्हीपासून बचावासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्क वापरा, आणि हात स्वच्छ धुवा.
श्वसनासंबंधी त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करा.
योग्य उपचार न मिळाल्यास हा व्हायरस फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करू शकतो. त्यामुळे लगेच डॉक्टरचा सल्ला घ्या .
लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे –
WHO ने सांगितले आहे कि , हा व्हायरस नवीन नाही . ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा RNA (Ribonucleic Acid) व्हायरस असून, तो Pneumoviridae कुटुंबातील आहे. डच संशोधकांनी या व्हायरसचा शोध 2001 साली लावला होता. पण नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत देशात एकूण नऊ रुग्ण आढळले आहेत , त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.
हे पण वाचा : धक्कादायक!! मुंबईत आढळला HMPV चा रूग्ण; 6 महिन्यांच्या बाळावर उपचार सुरू