Holi 2025 : होळीसाठी मुंबईहून 8 विशेष रेल्वेगाड्या; परतीच्या प्रवासाचीही सोय, जाणून घ्या वेळापत्रक

holi special train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Holi 2025 : होळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २०२५ च्या होळीला उद्यापासून सुरुवात होत आहे. होळीला अनेकजण आपल्या घरी जातात. चाकरमानी आपल्या गावाची वाट धरतात. प्रवाशांची संख्या लक्षात घेता होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मुंबईहून गोरखपूरदरम्यान ८ विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे केवळ होळीकरिता (Holi 2025) जाण्यासाठी नाही तर परतीचा प्रवासही सुखद होणार आहे. चला जाणून घेऊया या विशेष गाड्यांचे वेळापत्रक

लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष गाडी (८ फेऱ्या)

प्रस्थान: १३ मार्च ते २४ मार्च २०२५ (सोमवार व गुरुवार) सकाळी १०.२० वाजता
पोहोच: गोरखपूर – दुसऱ्या दिवशी रात्री ८.०० वाजता

गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी

प्रस्थान: ११ मार्च ते २२ मार्च २०२५ (मंगळवार व शनिवार) संध्याकाळी ७.०० वाजता
पोहोच: मुंबई – तिसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वाजता

या स्थाकांवर घेणार थांबे (Holi 2025)

ही विशेष गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, झांसी, प्रयागराज, अयोध्या, मनकापूर आणि खलीलाबाद येथे थांबे घेणार आहे.

या सुविधा मिळतील (Holi 2025)

४ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे
८ शयनयान डबे
४ सामान्य श्रेणी डबे
२ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन

होळीसाठी प्रवाशांची मोठी सोय

महाराष्ट्रात १३ मार्चला होळी आणि १४ मार्चला धुलिवंदन साजरा केला जाणार आहे. यामुळे अनेक प्रवासी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी प्रयत्नशील असतात. नियमित रेल्वेगाड्यांमध्ये तिकीटांची मोठी चणचण निर्माण होते. याच पार्श्वभूमीवर, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांची सोय केली आहे.
होळीच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांनी लवकरात लवकर तिकीट आरक्षण करून ठेवावे, अन्यथा शेवटच्या क्षणी तिकीट मिळवणे कठीण होऊ शकते!
रेल्वे प्रवाशांसाठी हा एक मोठा दिलासा असून होळीचा (Holi 2025) आनंद आता निर्बाधपणे उपभोगता येईल