सात दिवसाचा दुखवटा जाहीर, अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे सरकारचा निर्णय

atal bihari vajpeyi holiday
atal bihari vajpeyi holiday
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान त्यांच्या निधनामुळे सरकारने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. उद्या दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या पासून सात दिवस देशातील सर्व कार्यालयावरील राष्ट्रध्वज मध्यावर ठेवले जाणार आहेत. तसेच दिल्लीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयाना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच उद्या दिल्ली महानगर बंद राहणार आहे. वाचपेयी यांच्या जाण्याने देश भरातून तीव्र दुःख व्यक्त होत आहे.