५२ व्या वर्षी अभिनेत्रीनं केलं पाचवं लग्न; कोण आहे ही अभिनेत्री

टीम हॅलो महाराष्ट्र । बेवॉच फेम हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसनने वयाच्या ५२व्या वर्षी लग्न केलं आहे. पामेलाने ७२ वर्षाचे हॉलिवूड निर्माते जॉन पीटर्सशी लग्न केलं असून तिने केलेलं पाचवं लग्न आहे. जॉन आणि पामेला गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर आज पामेलाने बॅटमॅन सिनेमाचे निर्माते जॉनशी लग्न केलं. मीडिया रिपोर्टनुसार, पामेला आणि जॉनने एका खासगी कार्यक्रमात ‘मालिबु बीच ‘वर लग्न केलं.  अँडरसनने हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, कोणीही तुलना करू शकत नाही अशा पद्धतीने माझं त्याच्यावर प्रेम आहे.

 

पामेलाच्या लग्नांची यादी
पामेलाचं पहिलं लग्न अमेरिकन संगीतकार टॉमी ली याच्याशी झालं होतं. पण लग्नाच्या तीन वर्षांनंतरच दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने किड रॉकशी लग्न केलं. यानंतर तिने निर्माता रिक सोलोमनशी लग्न केलं. रिकला घटस्फोट दिल्यानंतर तिने पुन्हा एकदा त्याच्याशीच लग्न केलं. पण यानंतरही तिचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. पामेला तिच्या सिनेमांपेक्षा खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिली. सोलोमनला घटस्फोट दिल्यानंतर ती सॉकर स्टार आदिल रामीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ती आदिलसोबत फ्रान्समध्येच राहत होती. पण हे नातंही फार काळ टिकलं नाही. भारतातही पामेलाचे अनेक चाहते आहेत.

 

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

प्रिय ट्रोलर्स, तुम्ही कितीही खोटं बोललात तरी ‘छपाक’ यशस्वी झालाय..!! पहा सविस्तर आकडेवारी

पुण्यात आधी ‘आफ्टरनून लाइफ’ सुरू करायला हवं – आदित्य ठाकरे

चीनचा ‘कोरोनाव्हायरस’ जगभर पसरतोय; आतापर्यंत घेतले ४०० बळी, काय आहे ‘कोरोनाव्हायरस’? जाणून घ्या

You might also like