सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगली महापालिकेने सुरू केलेल्या सावली बेघर निवारा केंद्रास आज महापौर संगीताताई खोत आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी सदिच्छा भेट देत येथील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी मिरजेत सांगलीच्या धर्तीवर बेघर महिलांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती महापौर संगीताताई खोत यांनी यावेळी दिली.
या भेटीवेळी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सरवदे, समूह संघटिका वंदना सव्वाखंडे, शाहीन शेख, इंसाफ फौंडेशनचे मुस्तफा मुजावर, वंदना काळेल , रफिक मुजावर आदींसह सावली केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. सध्या सावली बेघर निवारा केंद्रात 40 बेघरांची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. याचबरोबर या केंद्रातील बेघरानी मिळून निवारा केंद्राच्या मागील बाजूस शेतील फुलवत असून त्याचे काम सर्व बेघर करत आहेत. त्यामुळे लवकरच बेघरांनी तयार केलेली शेती लवकरच फुलणार आहे.
यावेळी महापौर संगीता खोत म्हणाले की, शहरातील बेघरांची मोठी समस्या होती त्यामुळे महापालिकेने हे निवारा बेघर केंद्र सुरू केले आहे. याचबरोबर सांगलीच्या धर्तीवर मिरजेत फक्त महिलांसाठी बेघर निवारा केंद्रही लवकरच सुरू करीत आहोत. सांगलीचे सावली बेघर निवारा केंद्र उत्कृष्ठपणे सुरू असून यामध्ये असलेल्या बेघरांचे नक्कीच पुनर्वसन करून बेघरमुक्त शहर करण्याचा मानस आहे. यावेळी सावली बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मुस्तफा मुजावर यांनी महापौर संगीता खोत आणि आयुक्त नितीन कापडणीस यांचे स्वागत केले.