Home Loan : आपलं स्वतःचा हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठीत ‘घर बघावं बांधून’ ही म्हण सुद्धा प्रचलित आहे. कारण घर बांधत असताना कर्ज मंजूर करण्यापासून ते घर पूर्ण होण्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. होम लोन घेत असताना अनेक बँकांकडून होम लोन दिलं जातं मात्र प्रत्येक बँकांचे व्याजदर वेगळे असतात. तसेच होम लोन (Home Loan) घेताना प्रत्येक बँकांची सुविधा देखील वेगवेगळी असते. आज आपण बँक ऑफ महाराष्ट्राच्या होम लोन सुविधा बद्दल जाणून घेणार आहोत.
बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून होम लोनचे व्याजदर 8.35 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेले आहेत. एवढेच नाही तर कर्जावरील प्रोसेसिंग फी देखील माफ करण्यात आली आहे. म्हणजेच आधीपेक्षा बँक ऑफ महाराष्ट्र होम लोनचा दर 0.15 टक्क्याने कमी करून 8.35 टक्क्यांपर्यंत केला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र होम लोनचे महत्वाची वैशिष्ट्ये
- सध्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून होम लोन (Home Loan) वर 8.35% ते 11.15% इतका व्याजदर आकारला जात आहे.
- होमलोनची कमाल मुदत 30 वर्षापर्यंत/वयाच्या 75 वर्षापर्यंत आहे.
- तसेच बँक ऑफ महाराष्ट्र कडून यावर कुठल्याही प्रकारचे प्री पेमेंट / प्री क्लोजर/ पार्ट पेमेंट शुल्क आकारले जात नाही.
- तसेच कार आणि शैक्षणिक कर्जामध्ये होम लोन (Home Loan) घेणाऱ्याला आरओआयमध्ये सवलत मिळते.
- तसेच बँक ऑफ महाराष्ट्रकडून होम लोनवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही व कोणतेही छुपे शुल्क म्हणजे हीडन चार्जेस लागत नाहीत.
होम लोन घेताना काय घ्यावी काळजी ?
सर्वप्रथम कर्ज किती कालावधीसाठी आहे हे पहा
शक्यतोवर अल्पमुदतीच्या होम लोनची निवड न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण कर्जाचा (Home Loan) कालावधी जितका कमी असतो तितके कमीत कमी व्याज आपल्याला द्यावे लागते. त्यामुळे कर्ज घेताना त्याचा कालावधी लक्षात घेणे गरजेचे आहे.
प्री पेमेंट पेनल्टीबद्दल माहिती ठेवा
बँकांच्या माध्यमातून कर्जाच्या पूर्व पेमेंटवर दंड आकारला जातो. अशा परिस्थितीमुळे बँकांच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. या संबंधीच्या महत्त्वपूर्ण अटी व नियम देखील काळजीपूर्वक वाचून घ्यावे.
टर्म इन्शुरन्स घेणे गरजेचे
जेव्हा तुम्ही होमलोन घेता त्यावेळेसच मुदत विमा कवच घेणे खूप गरजेचे आहे. समजा अचानक मृत्यू झालास होमलोन फेडण्याचे टेन्शन वाढण्याची शक्यता असते. टर्म इन्शुरन्स मुळे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते.
तुमचे व्यवहार असलेल्या बँकेकडूनच कर्ज घ्या
ज्या बँकेमध्ये तुमचे खाते आहे आणि तुमच्या मुदत ठेवी वगैरे ठेवल्या आहेत अशा बँकेतून कर्ज (Home Loan) घ्यावे. कारण बँक त्यांच्या नियमित ग्राहकांना सहज आणि वाजवी व्याजदरामध्ये कर्ज देत असते.
बँकाच्या ऑफर्स जाणून घेणे गरजेचे
बँकांच्या माध्यमातून बऱ्याचदा कर्जदारांना खूप चांगल्या पद्धतीच्या ऑफर देण्यात येतात. या परिस्थितीमध्ये कर्ज घेण्यापूर्वी (Home Loan) बँकांच्या कोणकोणत्या ऑफर्स आहेत त्या जाणून घेणे गरजेचे आहे व प्रोसेसिंग फी बद्दल देखील माहिती करून घ्यावी.