Home Loan | आपलं स्वतःच असं एक घर असावं. हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. परंतु आजकाल घरांच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे एक रकमी घर घेणे सर्वसामान्य लोकांना शक्य होत नाही. परंतु स्वतःचे घर घेण्याचा विचार करत असाल, तर आणि तुमच्याकडे एवढे पैसे नसतील, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्हाला अत्यंत स्वस्त दरात गृहकर्ज देत आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे हे घराचे स्वप्न पूर्ण करू शकता. आणि तुम्हाला कर्ज (Home Loan) देखील चांगल्या दरात मिळेल.
HDFC बँक | Home Loan
एचडीएफसी बँक ही खाजगी क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. ही एक मोठी कर्ज पुरवठादार बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना गृहकर्जावर वर्षाला 9.4 ते 9.95% एवढा व्याजदर देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेकडून जर तुम्हाला गृहकर्ज घ्यायचे असेल, तर हे गृह कर्ज तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोरवर मिळते. या बँकेमध्ये ग्राहकाना 9.15% ते 9.75 टक्के दराने व्याजदर मिळते.
ICICI बँक
आयसीआयसीआय बँक ही देखील एक सगळ्यात मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना कर्जाच्या स्वरूपात चांगले व्याजदर देते. ही बँक त्यांच्या ग्राहकांना 9.40 ते 10.5 टक्के व्याजदर आणि गृह कर्ज देते.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक ही त्यांच्या पगारदार ग्राहकांना 8.7% आणि जे व्यक्ती स्वतःचा व्यवसाय करतात त्या व्यक्तींना 8.75 टक्के दराने गृहकर्ज देते.
PNB बँक
पीएनजी बँक म्हणजेच पंजाब नॅशनल बँक ही त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या सिबिल स्कोर वरून गृहकर्ज देत आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांना 9.4% ते 11.6% दराने व्याज आकारते.
प्रत्येक बँक सिबिल स्कोर 800 किंवा त्याहून अधिक असलेल्या व्यक्तींना 30 लाखापेक्षा जास्त कर्जासाठी 9.4 चा सगळ्यात कमी दर दिला जातो. हा कालावधी दहा वर्षापर्यंत आहे.