होम लोन वर मिळतोय गेल्या 15 वर्षातील सर्वात कमी व्याज दर, सणासुदीच्या हंगामात ‘या’ बँका देत आहेत स्पेशल ऑफर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आता आपल्या स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकेल. देशातील बर्‍याच मोठ्या बँका अत्यंत कमी दरावर होम लोन उपलब्ध करुन देत आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा आणि अ‍ॅक्सिस बँक यांचा समावेश आहे. अलीकडेच या बँकांनी होम लोन व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून सणासुदीच्या हंगामात मागणी वाढू शकेल. होम लोन वर कमी व्याज दराखेरीज अनेक प्रकारच्या ऑफर्सही दिल्या जात आहेत ज्याचा फायदा घर खरेदीदारांना होईल. तज्ज्ञ सांगत आहेत की, होम लोन वरील व्याज दर गेल्या 15 वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर आहे.

भारतीय स्टेट बँक : देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे SBI 30 लाख रुपयांच्या गृह कर्जावर 6.90 टक्के दराने व्याज आकारत आहे. 30 लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्जासाठी हा व्याज दर 7 टक्क्यांनी सुरू होईल. ग्राहकांना 75 लाखांच्या गृह कर्जावर 25 बेस पॉईंटची सूट देखील मिळेल. मात्र हे त्यांच्या सिबिल स्कोअरवर अवलंबून असेल.

सध्याचा सणासुदीचा हंगाम पाहता SBI ने कर्जासाठी 10 बेस पॉईंटची सवलत 30 लाख रुपयांपर्यंत वाढवून 20 बेस पॉईंट केली आहे. 8 मेट्रो शहरांमध्ये 3 कोटींच्या गृह कर्जावरही हे लागू होईल. SBI च्या योनो अ‍ॅपद्वारे अर्जावर 5 बेस पॉईंट्सची अतिरिक्त सूटही दिली जाईल.

कोटक महिंद्रा बँक: या बँकेत गृहकर्ज 6.90% पासून सुरू होत आहेत. कोटक महिंद्रा बँकेत जर दुसर्‍या बँकेचा ग्राहकाने आपले गृह कर्ज घेतले तर त्याला 20 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळेल. महिला कर्जदारांनाही खास सवलत मिळत आहे.

बँक ऑफ बडोदा: सरकारी क्षेत्रातील या तिसऱ्या सर्वात मोठ्या बँकेने शनिवारी रेपो लिंक्ड लेंडिग रेट मध्ये म्हणजेच आरएलएलआरमध्ये 15 बेस पॉईंट कपात जाहीर केली. बँक ऑफ बडोदामध्ये गृह कर्जावरील व्याज दर 6.85 टक्के पासून सुरू होत आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया : या बँकेने 30 लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्जावरील व्याज दरात 10 बेसिस पॉईंट्स कमी करण्याची घोषणा केली आहे. महिला कर्जदारांना 5 बेस पॉईंटचा अतिरिक्त लाभ मिळेल. या बँकेत गृह कर्जावरील व्याजदर 7 टक्क्यांपासून सुरू होत आहे. गृहकर्जावर 31 डिसेंबरपर्यंत कोणतीही प्रोसेसिंग फीस भरावी लागणार नाही.

Axis Bank वार्षिक 6.90 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. एचडीएफसी बँकेचे ग्राहक वार्षिक 6.90% दराने गृह कर्ज घेऊ शकतात. एचडीएफसी बँकेला 0.50 टक्के दराने प्रोसेसिंग फीस भरावी लागेल परंतु ही फी 3,000 पेक्षा जास्त होणार नाही. जास्तीत जास्त 3,000 रुपयांच्या प्रक्रियेवर कॅपिंग लादले गेले आहे. आयसीआयसीआय बँक देखील 6.95 टक्के दराने गृहकर्ज देत आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 8080340221 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. 

Leave a Comment