Home Loan | 20 हजार रुपये पगारावर किती होम लोन मिळेल? जाणून घ्या रक्कम आणि संपूर्ण प्रोसेस

Home Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Home Loan | प्रत्येक माणसाची आयुष्यात स्वतःचे घर घेण्याची इच्छा असते. परंतु आजकाल घरांच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत की, एक रकमी हे घर विकत घेणे शक्य होत नाही. यासाठी प्रत्येक जण हा कर्जाचा पर्याय निवडतो. आज काल बँकेद्वारे कर्ज मिळणे खूप सोपे झालेले आहे. आजकाल बघायला गेले, तर रियल इस्टेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. आणि याचे कारण म्हणजे अत्यंत सोप्या पद्धतीने आणि जलद पद्धतीने मिळणारे गृह कर्ज. परंतु जर तुम्ही गृह कर्ज (Home Loan) घेत असाल तर बँका देखील अनेक गोष्टींचा विचार करतात. आणि त्यानंतरच तुम्हाला गृह कर्ज देण्यास मान्यता करतात. जर तुमचा पगार 20,000 रुपये किंवा त्याच्या आसपास असेल तर गृह कर्जासाठी तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते. गृह कर्जासाठी आता कोणकोणत्या पात्रता बँका लक्षात घेतात हे आपण जाणून घेणार आहोत.

वयोगट | Home Loan

वित्तीय संस्था हे कर्ज देताना आपल्याकडे किती रोजगारक्षम वर्ष आहे. त्याची सगळे तपासणी करतात. तसेच आपण घेतलेल्या कर्जाची परतफेड नीट व्हावी. आणि कलरचा कालावधी निश्चित व्हावा यासाठी केले जाते. त्यामुळे 21 ते 65 वयोगटातील लोक हे गृह कर्जासाठी (Home Loan) अर्ज करू शकतात. आणि या लोकांचे अर्ज देखील पात्र केली जातात.

क्रेडिट रेटिंग

वित्तीय संस्था हे आपला क्रेडिट स्कोर देखील बघतात. म्हणजे इथून मागे आपण कोणते कर्ज घेतलेले आहेत. आणि त्याचा परत फेड आपण कशा पद्धतीने केलेली आहे. ती वेळात केलेली आहे हे देखील पाहतात. सर्वसाधारणपणे 650 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोर असल्याची प्रक्रिया खूप लवकर होते. तसेच 750 पेक्षा जर तुमचा क्रेडिट स्कोर असेल, तर व्याजदरावर देखील काही घसरण तुम्हाला मिळते.

कंपनीची विश्वासहार्यता

जर तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल तर तिथे मालकाची विश्वासहाय्यता देखील गृह कर्ज मंजूर होण्यासाठी फायद्याचे ठरते. जर तुम्ही एखाद्या नामांकित कंपनीत काम करत असेल, आणि आर्थिक दृष्ट्या अधिक स्थिर पाहिले जाऊ शकते.

चालू कर्ज | Home Loan

गृह कर्ज देताना वित्तीय संस्था ह्या सध्या तुमच्यावर कोणते कर्ज चालू आहे? आणि त्याची परतफेड तुम्ही कशा प्रकारे करत आहात? तुमचे मासिक वेतन किती आहे? आणि त्याबरोबर तुम्ही किती कर्जाची परतफेड करू शकता. या सगळ्याची तपासणी करते आणि मगच कर्ज देते.

20 हजार रुपये मासिक पगारावर गृह कर्जाची रक्कम

जर तुमचे मासिक वेतन 20 हजार रुपयांच्या आसपास असेल, तर त्यावेळेस वेळी बँका देखील आपल्याला सर्व पैलूंचा विचार करून कर्जाची पात्रता मान्य करतात. जर कर्मचाऱ्याला त्याचा एकूण पगार मिळत नसल्याने ही रक्कम पगाराच्या आधारे मोजली जाते. म्हणजे पगार कर्मचारी हे त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या 60 टक्क्यापर्यंत गृह कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतात. जर तुमचे 20 हजार रुपये मासिक वेतन असेल तर एखाद्या व्यक्तीला 10 ते 12 लाख रुपयांचे गृह कर्ज मिळते .

गृहकर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • जन्माचा पुरावा
  • उत्पन्नाचा पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • स्वाक्षरीचा पुरावा